प्रा. डॉ. मधुकर धुतुरे यांना दुबई येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
schedule18 Nov 24 person by visibility 279 categoryसामाजिक
कळे : विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कळे (ता.पन्हाळा जि.कोल्हापूर) समाजशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. मधुकर धुतुरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. दुबई येथील महात्मा ज्योतिराव फुले विचारमंचतर्फे विश्व जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळाच्या वतीने चौथे साहित्य संमेलन आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत डॉ .रावसाहेब कसबे ,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (पुणे), डॉ जगन कराडे अध्यक्ष दीपस्तंभ सांस्कृतिक मंडळ (सांगली, )प्राचार्य, डॉ वैशाली प्रधान (संभाजीनगर, )डॉ. दीपक कुमार खोब्रागडे (नागपूर) अध्यक्ष, जागतिक आंबेडकरवादी मंडळ डॉ कृपाशंकर वासनिक (दिल्ली) डॉ एम के मकवाना (गुजरात) यांच्या प्रमुख उपस्थित होती . डॉ.मधुकर धुतुरे यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांचा शैक्षणिक व सामाजिक कार्याचा अनुभव आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर समाजशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. शिवाजी विद्यापीठाचे पीएचडीचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिन विद्यार्थ्यांना पीएचडीची पदवी प्रदान करण्यात आली आहे. व तीन विद्यार्थी पीएचडीचे मार्गदर्शन घेत आहेत,