कोल्हापूर जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत बंदी आदेश लागू
schedule22 Nov 25 person by visibility 69 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात 25 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 7 डिसेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्ये,अधिकार बजावण्यासंदर्भात आणि कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात तसेच एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना
तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना त्याचबरोबर लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना हा आदेश लागू राहणार नाही .