डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्र. कुलपतीपदी ऋतुराज पाटील यांची नियुक्ती; कुलपती डाॅ. संजय पाटील यांची घोषणा
schedule20 Jan 26 person by visibility 87 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्र. कुलपतीपदी विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा कुलपती डाॅ. संजय पाटील यांनी केली.
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात डाॅ. पाटील यांनी ही घोषणा केली. डॉ. पाटील म्हणाले, विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी २०१७ पासून डी. वाय. समुहामध्ये जबादारी स्वीकारून डेव्हलपमेंट केली. त्यावेळी ४ हजार विद्यार्थी संख्या आता १६ हजारावर पोहचली आहे. तळसंदे येथे कृषी विद्यापिठ सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तीन वर्षात हे विद्यापिठाला देशभरात नाव पोहचवले. यामुळे आता त्यांच्यावर विद्यापिठाच्या प्र. कुलगूरु पदाची जबाबदारी देत आहे.
यावेळी आई सौ. वैजयंती पाटील, संजय किर्लोसकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, पुजा पाटील,देवश्री पाटील, तेजस पाटील, डॉ. अनिलकुमार गुप्ता, डॉ. जे. ए. खोत, विलास शिंदे, भावित नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, २०१७ पासून संस्थेची जबाबदारी सांभाळत आहे. या पदामुळे माझी जबाबदारी आणखी जबाबदारी वाढली असून निश्चीतच पदाला साजेसे काम करणार असल्याची ग्वाही दिली.