पाचगाव येथील किल्ला बॉईजने साकारली अहिवंत, मार्कंड्या किल्ल्यांची प्रतिकृती
schedule26 Oct 25 person by visibility 149 categoryसामाजिक
कोल्हापूर : पाचगाव येथील ऋषिकेश पार्क येथील किल्ला बॉईज तर्फे दीपावलीमध्ये अहिवंत, मार्कंड्या किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.
दिवाळीमध्ये किल्ला बनवण्याची परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि स्वराज्याचे प्रतीक म्हणून पाळली जाते. किल्ला बनवणे हा एक सांस्कृतिक वारसा आहे जो शौर्य आणि सकारात्मकतेची भावना वाढवतो विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील 'मराठा लष्करी भूदृश्यां'च्या मालिकेत ११ किल्ले आणि तामिळनाडूतील एक किल्ला, असे एकूण १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झाले आहेत.
यामुळे मुलांमध्ये उत्साह असून यामुळे दिवाळीला मोठ्या प्रमाणात किल्ल्यांची प्रतिकृती शहरात तयार करण्यात आल्या आहे पाचगाव येथील ऋषिकेश पार्क येथील किल्ला बॉईज तर्फे अहिवंत, मार्कंड्या किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती प्रसाद सुतार, शौर्य पाटील, समर्थ चव्हाण, आर्यन सुभेदार, हर्षल म्हेत्रे, सार्थक इंगवले, विराज सुतार, तेजस भालेराव, आयुष चव्हाण यांनी साकारली आहे.