SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू सलोखा मंच, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे 'निमित्त फराळाचे, स्नेह बंधुत्वाचा...' उपक्रम उत्साहातमच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनासहर्ष टोकले बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखान्याचे उद्घाटन पाचगाव येथील किल्ला बॉईजने साकारली अहिवंत, मार्कंड्या किल्ल्यांची प्रतिकृती‘जिल्हा युवा महोत्सव २०२५’ साठी युवकांना ४ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन नोंदणीचे आवाहनमुंबईतील फुटबॉलपटूंना सुवर्णसंधी!तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदकगांधीनगर येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या चोरट्यास अटकवारी परिवार मंगळवेढा यांचे शाश्वत प्रतिष्ठानतर्फे स्वागत

जाहिरात

 

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखान्याचे उद्घाटन

schedule26 Oct 25 person by visibility 136 categoryउद्योग

कोल्हापूर :  गुजरीच्या गल्लीत एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग  प्रा. लि., या नामांकित दागिन्यांच्या कंपनीने आपल्या अत्याधुनिक दागिन्यांच्या निर्मिती युनिटचे भव्य उद्घाटन शिरोली (कोल्हापूर) येथे करण्यात आले.

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग स्थापना सन १९७३ मध्ये  हंजारीमलजी राठोड यांच्या पुढाकाराने झाली होती. व्यवसायाची सुरुवात  राठोड परिवाराचे कुटुंबप्रमुख  हंजारीमलजी राठोड यांनी गुजरी येथून एका छोट्या दुकानातून केली, पुढे जाऊन प्रतिभा नगर मध्ये दागिने मॅन्युफॅक्चरिंग  करिता एक छोटा कारखाना सुरू केला, त्यापुढे चंद्रकांत राठोड यांनी शिरोली येथे एका छोट्या युनिटमध्ये  मॅन्युफॅक्चरिंग चे काम वाढवत सुरू ठेवले, आणि त्यापुढे जयपुर मध्ये (राजस्थान) येथे त्यांनी  अजून एक अत्याधुनिक जयपूरची राजस्थानी ट्रेडिशनल ज्वेलरी बनवण्याचा कारखाना देखील सुरू केला आहे. 

गेल्या पाच दशकांपासून उत्कृष्ट गुणवत्ता, विश्वासार्हता आणि नवकल्पनांमुळे राठोड ज्वेलर्स हे नाव दागिन्यांच्या जगतात अग्रस्थानी राहिले आहे.

 राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग ही नवी अत्याधुनिक उत्पादन सुविधा कंपनीच्या उद्योजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनी आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण ज्वेलरी ब्रँड्सना मोठ्या प्रमाणावर दागिन्यांचा पुरवठा करते. उपलब्ध माहितीनुसार, राठोड ज्वेलर्स मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. उच्च प्रतीचे सोन्याचे दागिने (उदा. अँटिक गोल्ड, अनकट डायमंड, पोलकी चे हार, कुंदन व जडाऊ दागिने, कष्टमाइज्ड डिझाइनर ज्वेलरी) असे विविध प्रकारचे दागिने उत्पादन करण्यासाठी ओळखली जाते.

नवीन ज्वेलरी उत्पादन कारखान्याच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री  प्रकाश आबिटकर , खासदार  धनंजय म्हाडीक , खासदार  धैर्यशील माने , आमदार  सतेज पाटिल , आमदार  राहुल अवाडे , माजी खासदार  संजय मंडलिक, सुपरिटेंडेंट ऑफ़ पुलिस  योगेश गुप्ता, मालाबार गोल्डचे व्हॉइस प्रेसिडेंट  के. पी. अब्दुलसलाम, जॉयलुकासचे  सुरेश जैन, विविध मान्यवर, स्थानिक उद्योगपती तसेच राठोड परिवार आणि  मित्रमंडळींची उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राठोड ज्वेलर्सच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक करत, या नव्या अत्याधुनिक युनिटमुळे (कारखाना) कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आणि कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे उदगार काढले.

मान्यवरांनी यावेळी राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग चे  मॅनेजिंग डायरेक्टर श्री. चंद्रकांत राठोड आणि त्यांच्या कुटुंबाचे (पत्नी रूपाली , कन्या रीवा , चिरंजीव हीद्रय ) अभिनंदन केले. गुजरीमधील छोट्या दागिन्यांच्या कारखान्यापासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरवठादार कंपनीपर्यंतच्या या यशस्वी वाटचालीवर मान्यवरांनी प्रकाश टाकला आणि कोल्हापूरच्या पारंपरिक सुवर्ण कारागिरीला आधुनिकतेची जोड देऊन जागतिक स्तरावर नेल्याबद्दल कौतुक केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर  यांनी राठोड यांनी छोट्याशा दुकानातून सुरू केलेला व्यवसाय हा आता नवीन कारखान्याच्या रूपाने पुढे आला आहे, अथक परिश्रमातून राठोड कुटुंबियांनी आपला व्यवसाय वृद्धिगत केला आहे असे सांगून त्यांच्या या दागिने उद्योग क्षेत्राबरोबर आता कोल्हापूरमध्ये राठोड कुटुंब यांनी दागिन्यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभा करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून याद्वारे  कोल्हापूरची ओळख सर्व दूर होणार असून दागिने बनविण्याचा कारखाना सुरू करून कोल्हापूरमध्ये एक अभिमानास्पद काम केले आहेत असे सांगितले.

यापुढे बोलताना खासदार  धैर्यशील माने यांनी राठोड कुटुंबाची उतुंग भरारी ही कोल्हापूरसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असून पश्चिम महाराष्ट्रात यामुळे कोल्हापूरचे नाव सर्व दूर पोहोचलेले आहे कोल्हापूर मधील हुपरी हे गाव चांदी व्यवसायासाठी परिचित आहे तसेच राठोड कुटुंबाचे नाव या दागिने व्यवसायामध्ये  सर्वदूर पोहोचणार आहे. राठोड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्या मुळे कोल्हापूरच्या दागिन्यांची ओळख आता सर्व दूर पोहोचणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर बोलताना खासदार  धनंजय महाडिक यांनी चंद्रकांत राठोड यांचे कोल्हापूर मध्ये नवीन अत्याधुनिक मशिनरी सह दागिने बनवण्याचा मॉर्डन कारखानासुरू एक मोठे युनिट आज पासून सुरू होत असून, असा भव्य दिव्य कारखाना कोल्हापूर मध्ये आता राठोड यांच्यामुळे पहावयास मिळणार आहे ही कोल्हापूरच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार  सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात पुढे आहे तसेच आता दागिन्याच्या बाबतही राठोड यांच्यामुळे आणखी पुढे येणार असून राठोड यांनी कला दाखविण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

राठोड कुटुंबातील तिसरी पिढी रीवा आणि ह्रदय यांनी आपल्या कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तुंग भरारी घेतली असल्याचे नमूद केले. यावेळी बोलताना मलाबार गोल्ड चे व्हॉइस प्रेसिडेंट  के.पी अब्दुल सलाम यांनी बोलताना राठोड कुटुंबाचे अभिनंदन केले.

या अत्याधुनिक उत्पादन युनिटमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाचे सोन्या-चांदीचे दागिने तयार केले जाणार आहेत. जागतिक दर्जाची गुणवत्ता, कुशल कारागीर आणि नाविन्यपूर्ण डिझाईन्स यांच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे हे राठोड ज्वेलर्सचे ध्येय आहे.

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग च्या नव्या युनिटमुळे कोल्हापूरच्या सुवर्ण उद्योगाला नवी दिशा मिळेल, तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. राठोड परिवार तर्फे चंद्रकांत राठोड यानी सर्व उपस्थिताचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes