मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
schedule26 Oct 25 person by visibility 98 categoryराज्य
मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर २५ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
त्यामुळे वाऱ्याचा वेग ३५ ते ४५ किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी तो ५५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
समुद्रामध्ये असलेल्या सर्व मासेमारी नौकांनी तात्काळ सुरक्षितपणे बंदरात परत यावे तसेच स्थानिक बंदर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.