सहर्ष टोकले बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य
schedule26 Oct 25 person by visibility 126 categoryक्रीडा
कोल्हापूर : अनुज् चेस ॲकॅडमीच्यावतीने मुरगूड विद्यालय (ज्यू. कॉलेज), मुरगूड येथे दि 26 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय 16 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन समीर कटके, सचिन टोकले यांच्या हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले.
स्पर्धेमध्ये 4 फेऱ्या घेण्यात आल्या. सहर्ष टोकले याने 4 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. समर्थ घुले याने 3 गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले.
स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे
तृतीय क्रमांक शौर्य कटके गुण
चौथा क्रमांक शिवराज कामटे 3 गुण
पाचवा क्रमांक गौरव फराकटे 2 गुण
16 वर्षाखालील इतर विजेते
8 वर्षाखालील
प्रथम क्रमांक ओम भांदिगरे 2 गुण
द्वितीय क्रमांक कृष्णराज सूर्यवंशी_ पाटील 1.5 गुण
10 वर्षाखालील
प्रथम क्रमांक त्रिशिका मोहिते 1 गुण
12 वर्षाखालील
प्रथम क्रमांक सार्थक घुले 2 गुण
द्वितीय क्रमांक शिवतेज कामटे 2 गुण
14 वर्षाखालील
प्रथम क्रमांक भगवान भारमल 2 गुण
अनुज् चेस अकॅडमी विजेते
प्रथम क्रमांक रणवीर सारंग 1 गुण
द्वितीय क्रमांक राजवीर सारंग 1 गुण
उत्तेजनार्थ बक्षीसे
ऋतुपर्ण कदम
स्पर्धेमध्ये एकूण 25 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून बाबूराव पाटील यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण संदिप सारंग, प्राध्यापक विवेक सूर्यवंशी_ पाटील, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील, उत्तम कामटे तसेच अनिल भांदिगरे आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीप सारंग, अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.