राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित, असे आहे आरक्षण...
schedule22 Jan 26 person by visibility 126 categoryराज्य
मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाचे आरक्षण आज मंत्रालयात जाहीर झाले आहे. यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, पनवेल, अकोला आणि अहिल्यानगर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आता ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) समाजाचा महापौर होणार आहे.या सोडतीत ST साठी 1, SC साठी 3, महिलांसाठी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महापौरपदे निश्चित झाली आहेत.
🟠 कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण?
▪️कल्याण डोंबिवली - एसटी
▪️लातूर - अनुसूचित जाती (महिला)
▪️जालना - अनुसूचित जाती (महिला)
▪️ठाणे - अनुसूचित जाती
▪️पनवेल - ओबीसी
▪️इचलकरंजी - ओबीसी
▪️अकोला - ओबीसी (महिला)
▪️अहिल्याबगर - ओबीसी (महिला)
▪️उल्हासनगर - ओबीसी
▪️कोल्हापूर - ओबीसी
▪️चंद्रपूर - ओबीसी (महिला)
▪️जळगांव - ओबीसी (महिला)
▪️मुंबई - खुला प्रवर्ग (महिला)
▪️पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
▪️छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)
▪️धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
◼️अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)
▪️भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग
▪️मालेगाव – खुला प्रवर्ग (महिला)
▪️मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग (महिला)
▪️नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
▪️नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)
▪️पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग
▪️नाशिक – खुला प्रवर्ग (महिला)
▪️नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
▪️परभणी – खुला प्रवर्ग
▪️सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
▪️वसई-विरार – खुला प्रवर्ग
▪️सोलापूर – खुला प्रवर्ग