प्रभाग क्रमांक 11 मध्ये अपक्ष उमेदवार रिची फर्नांडिस, किशोर यादव यांना सकारात्मक वातावरण
schedule13 Jan 26 person by visibility 110 category
कोल्हापूर : नको नेता, नको पक्ष जनता ठरवणार नगरसेवक अपक्ष ही टॅगलाईन घेऊन महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 11 मध्ये रिची फर्नांडिस व किशोर यादव हे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील जनमान्य उमेदवार म्हणून रिची फर्नांडिस आणि किशोर यादव यांच्याकडे पाहिले जाते. प्रभाग क्रमांक 11 मध्ये या अपक्ष उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर विशेष लक्ष देऊन सकारात्मक वातावरण तयार केले आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग क्रमांक 11 मध्ये मूलभूत सुविधा अजूनही अपूर्णच आहेत. आपल्या प्रभागांमध्ये महानगरपालिकेचा एकही दवाखाना नाही कचरा उठाव वेळेवर होत नाही प्रसाधन गृहांची दुरावस्था, आरोग्य विषयक समस्या ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र नाही अशा विविध समस्या चे समाधान करण्यासाठी आपण या निवडणूक रिंगणात उतरल्याचे रिची फर्नांडिस व किशोर यादव यांनी सांगितले.
रिची फर्नांडिस हे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू असून क्रीडा क्षेत्रांमध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. तर किशोर यादव हे सामाजिक कार्यकर्ते असून महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत सर्वसामान्य कुटुंबातील व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दोघांनीही प्रभागाच्या विकासासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वैयक्तिक गाठीभेटी प्रचार फेरी या जोरावरती त्यांनी प्रभागांमध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती केली असून मतदारांचा वाटता प्रतिसाद त्यांना लाभत आहे.

