नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीतून घडते यश; तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजची गुणवत्ता परंपरा कायम
schedule12 Jan 26 person by visibility 88 categoryशैक्षणिक
वारणानगर : नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणप्रक्रियेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता जपण्याची परंपरा तात्यासाहेब कोरे डिप्लोमाने सिद्ध केली आहे. दर्जेदार तंत्रशिक्षणाचा अवलंब करत संस्थेने विद्यार्थ्यांना सातत्याने यशाच्या दिशेने नेले असून, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये अव्वल निकाल मिळवण्याची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या हिवाळी परीक्षेच्या निकालात विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य तसेच संस्थेच्या नेतृत्वाकडून मिळणारे प्रेरणादायी मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
हिवाळी २०२५ परीक्षेत महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. अनुक्रमे निकाल असा- प्राची प्रकाश शिंदे ९०.२४%, प्रतिक युवराज पाटील ८९.६५%, राजेश्वरी सुनील दस ८८.५९%, वैष्णवी विजय मोरे ८८.२२%, सार्थक भूषण मुदगल ८७.०६%, मंथन संदीप कोठावळे ८७.०६%, सुयोग जयसिंग साळुंखे ८५.७६%, तन्वी दत्तात्रय पाटील ८४.७८%, प्राची संतोष म्हाळुंगेकर ८४.३५%, समृद्धी सुभाष पाटील ८३.७६%, यश महादेव अभिरकर ८३.५३%, वेदिका आनंदराव पाटील ८२.४७%.
या यशाबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, प्राचार्य पी. आर. पाटील, मार्गदर्शक डॉ. पी. एम.पाटील,शैक्षणिक समन्वयक एस. व्ही. सुर्वे तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

