नव्या विचाराचा, युवा उमेदवार अश्किन आजरेकरसह महायुतीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा
schedule12 Jan 26 person by visibility 68 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापुरातील राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू, उच्च शिक्षित, उत्कृष्ट क्रीडा संघटक, आजरेकर फौंडेशनच्या माध्यमातून अनेक क्रीडा विषयक उपक्रम यशस्वी आयोजन करत सक्रिय सहभाग, सामाजिक, राजकीय क्रीडा क्षेत्राचे भान असणारा एक नव्या विचाराचा युवा उमेदवार अश्किन आजरेकर होय. आश्किन आजरेकर हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 12 अ मधून मैदानात उतरले आहेत. प्रभागामध्ये मतदारांशी संपर्क, प्रचार रॅली याद्वारे ते संपर्क साधून महायुतीच्या उमेदवारांची भूमिका पटवून देत आहे त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर अश्किन गणी आजरेकर, राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर वैष्णवी वैभव जाधव, व आदिल बाबू फरास, तसेच महायुती पुरस्कृत उमेदवार अमृता सुशांत पवार या संगणक या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. प्रभागामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये गती घेतली असून त्यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आश्किन आजरेकर यांचे वडील गणी आजरेकर गेली 40 वर्ष मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग राहिला आहे. तसेच अश्किन यांच्या पत्नी निलोफर आजरेकर या गत सभागृहामध्ये बिनविरोध महापौर झाल्या होत्या. कोरोना काळात त्यांनी खऱ्या अर्थाने जनसेवेचे कार्य केले. तर आशफाक आजरेकर हे आजरेकर फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यामुळे सामाजिक वारसा लाभलेल्या आश्किन आजरेकर यांना मतदारातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

