+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूर ते पुणे या मार्गावर आता स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस धावणार : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती adjustराजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; राज्यपालांकडून बाप्पाला निरोप adjustयशस्वी होण्यासाठी कौशल्ये आत्मसात करा: संदीप पाटील; कोरे अभियांत्रिकीत प्रथम वर्षाचे उत्साहात स्वागत adjustडॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूटद्वारे 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' adjustहोमगार्ड भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पुरुष व महिला उमेदवारांनी उपस्थित रहावे : अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई adjustशरद पवारांच्या मूक संमतीने ज्ञानेश महारावांनी हिंदू धर्म विरोधात गरळ ओकली; भाजपा कोल्हापूरची निदर्शने adjustपन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने घरगुती ,सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव स्पर्धा adjustकोल्हापूर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 1 हजार 500 क्युसेक विसर्ग adjustपालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यापूर्वीच इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती पदाधिकाऱ्यांना अटक adjustधार्मिक अल्पसंख्यांक शाळांनी अनुदान योजनेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule05 Nov 21 person by visibility 1307 categoryसंपादकीय

कोरोनारुपी महामारीमुळे आलेली गेले दीड-पावणेदोन वर्षांची मरगळ झटकून सोमवारपासून प्रकाश पर्व सुरू झाले आहे. दिवाळीचा हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही SMP हे न्युज पोर्टल कोल्हापूरकरांच्या सेवेत रुजू करत आहोत.

गेले दीड-पावणेदोन वर्ष सारे जग कोरोनारुपी भीतीच्या सावटाखाली होते. भारतालाही याचा चांगलाच फटका बसला. यात महाराष्ट्र तर आघाडीवर होता. अनेकांनी जीव गमावला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. सततच्या लॉक डाउनमुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. उद्योग धंदे मान टाकू लागले. सप्टेंबरपासून दुसर्याय लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनलॉक झाल्याने उद्योग धंदे सुरू झाले असून, अर्थ व्यवस्था सावरू लागली आहे. लसीकरणातही आघाडी घेतल्याने संभावित तिसऱ्या लाटेची भीतीही जनतेच्या मनातून कमी झाली आहे. गणेशोत्सव, दसरा कोणत्याही विघ्नाविना पार पडले. आता प्रकाशाचा सण दिवाळी येत आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. तिमिरातुन तेजाकडे असा भास होत आहे. उद्योग धंद्यांची चक्रेही धाऊ लागली आहेत. मात्र, अजूनही काही धडपडत आहेत, वाट चुकत आहेत. अशांना दिशा दाखविण्यासाठी दिशादर्शकाची गरज असते. याच भूमिकेतून या प्रकाश पर्वात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर SMP न्युज हे पोर्टल कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल झाले. 

निष्पक्ष, परखड बातमी देण्याबरोबरच आबालवृद्ध यांच्यासह तरुणाईच्या समस्या मांडण्यावर भर देण्याचा प्रयत्न असेल. करवीरनिवासीनी अंबाबाई, दक्खनचा राजा जोतिबाची कृपा, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू राजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. पुरोगामी विचार अंगिकारलेल्या करवीरनगरीत सहकार चांगलाच रुजला आहे. राजकीयदृष्ट्याही राज्यात कोल्हापूरने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. इथली कृषिसंपदा राज्यात नव्हे तर देशात आदर्शवत अशी आहे. या सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या पोर्टलद्वारे केले जाईल. त्यासाठी गरज आहे कोल्हापूरकरांच्या पाठबळाची. ‘फक्त लढ म्हणा’ म्हणण्याची.