SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तपोवन मैदानावर ४ ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजनजैवविविधतेचा रक्षक: जागतिक जॅग्वार दिनसंजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातडिलिमिटेशनवरून महाविकास आघाडीत ठिणगी! पवारांच्या भूमिकेचे मुश्रीफांकडून स्वागत; वडेट्टीवार-राऊतांचा समाचार‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटीलविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अजितकुमार पाटीलनैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळाधैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मानभारतीय लोकशाही टिकविण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आवश्यक : प्रा. डॉ. प्रवीण पाटील

जाहिरात

 

तपोवन मैदानावर ४ ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन

schedule29 Nov 26 person by visibility 57 categoryउद्योग

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीची व नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२६ येत्या ४ ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. येथील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन चार दिवस भरविण्यात आले असून या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याच बरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान, नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 यावेळी संयोजक विनोद पाटील, सुनील काटकर, धीरज पाटील, स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. तरी चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असे संयोजकांनी आवाहन केले आहे.

प्रदर्शनाचे २०२६ हे ८ वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, २०० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा जनावरांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्यात आल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

प्रदर्शनाला महालक्ष्मी बिजनेस ग्रुप सागर भालेकर सरूडकर, गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी, यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनात कोठारी पाईप, के पी टी इंडस्ट्रीज, कॅप्टन ट्रॅक्टर, शक्तिमान रोटावेटर, कुबोटा ट्रॅक्टर, मयुरेश टेक्नॉलॉजी, समृद्धी प्लास्टिक आदीं नामावंत कंपन्यांसह अन्य १०० नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. या कंपन्यांची विविध उत्पादने या ठिकाणी शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहेत व खरेदी करता येणार आहेत.

यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.

◼️सतेज कृषी २०२६ टंचाई सदृश्य परिस्थितीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिनांक ६ डिसेंबर २०२६ 
1. डॉ गोरक्षण वाघचौरे, प्रमुख शास्त्रज्ञ, – राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थ, बारामती ; विषय : टंचाई परिस्थितीत ऊस उत्पादनात करावयाच्या उपाययोजना 
2. डॉ सुनील कर्हाड (Karhad), सहायक संशोधन संचालक, एमपीकेव्ही राहुरी विषय : टंचाई परिस्थितीत चारा उत्पादन उत्पादन
3. डॉ अविनाश चव्हाण सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग कोल्हापूर; विषय : टंचाई परिस्थितीत चारा प्रक्रिया व साठवणूक

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes