SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातडिलिमिटेशनवरून महाविकास आघाडीत ठिणगी! पवारांच्या भूमिकेचे मुश्रीफांकडून स्वागत; वडेट्टीवार-राऊतांचा समाचार‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटीलविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अजितकुमार पाटीलनैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळाधैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मानभारतीय लोकशाही टिकविण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आवश्यक : प्रा. डॉ. प्रवीण पाटील‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर जि.प. सदस्या विनिता भोगम ॲक्शन मोडवरशिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त सोहळ्यात ६०,२५० पदवीधर; विद्यार्थिनींची ५७.५५ टक्के बाजी, ‘विकसित भारत २०४७’ चा निर्धार

जाहिरात

 

डिलिमिटेशनवरून महाविकास आघाडीत ठिणगी! पवारांच्या भूमिकेचे मुश्रीफांकडून स्वागत; वडेट्टीवार-राऊतांचा समाचार

schedule28 Nov 26 person by visibility 137 categoryराजकीय

कोल्हापूर : परिसीमन (डिलिमिटेशन) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाने दिलेल्या पाठिंब्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (दि. २८ नोव्हेंबर) मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवाद साधत पवारांच्या भूमिकेचे स्वागत केले; तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला.

◼️पंतप्रधान मोदी-शहांचा करिष्मा आणि पवारांच्या भूमिकेचे स्वागत
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, पूर्वी लोकसंख्येच्या आधारे वाढणाऱ्या जागांमुळे काही ठराविक राज्यांतच खासदार वाढतील आणि त्याचे अनिष्ट परिणाम होतील, अशी भूमिका द्रमुकसह शरद पवार गटाची होती. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी ५० टक्के जागांची मागणी लावून धरली होती. केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, आता खासदारांची संख्या सध्याच्या संख्येच्या दीडपट होईल आणि प्रत्येक अतिरिक्त खासदारामागे ६ आमदार वाढतील. यामध्ये महिला, एससी आणि एनटी प्रवर्गासाठी आरक्षण असणार आहे. यामुळे महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक पक्षांचे मतपरिवर्तन केले आहे. शरद पवार गटाने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे मुश्रीफ यांनी नमूद केले.

◼️वडेट्टीवार आणि राऊतांवर सडकून टीका
विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांवर केलेल्या 'खंजीर खुपसण्याच्या' टीकेवर मुश्रीफ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "पक्षात या विधेयकावरून मतभेद आहेत आणि पक्ष एकसंध ठेवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे पवारसाहेबांनी कालच काँग्रेस नेत्यांना स्पष्ट केले होते. पवारसाहेबांवर आज रुग्णालयात उपचार सुरू असताना अशा प्रकारचे भाष्य करणे अत्यंत अशोभनीय आणि निषेधार्ह आहे."

खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, या विधेयकातून महिलांना आरक्षण मिळणार आहे आणि अवाढव्य मतदारसंघ लहान होणार आहेत. विरोधाला विरोध करण्याची भूमिका राऊतांना कदाचित पचनी पडली नसेल. तसेच, 'खासदारांना १५० कोटी रुपये दिल्याच्या' राऊतांच्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, याचे स्पष्टीकरण राऊतांनीच द्यावे; कारण हा दावा सर्वसामान्य माणसालाही पटलेला नाही.

◼️मविआच्या भविष्याबाबत भाष्य आणि विकासकामांचा मुद्दा
मविआतील बेकीमुळे भविष्यावर काय परिणाम होईल, या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले की, हा प्रस्ताव सर्वांच्या हिताचा आहे. २४ ते ३० लाख मतदारसंख्या असलेल्या लोकसभेच्या मतदारसंघात खासदार जनतेपर्यंत कसे पोहोचणार आणि ५ कोटींच्या निधीत काय विकास करणार? जागा वाढल्यानंतर मतदारसंघ लहान होतील, जनतेशी संपर्क वाढेल आणि विकासकामांना अधिक निधी मिळेल. काँग्रेसच्या 'भाजपविरुद्ध देश' या मोहिमेवर बोलताना, विरोधी पक्षाचे कामच विरोधाचे असते, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, भविष्यात शरद पवार गट महायुतीत येणार का, या प्रश्नावर "भविष्यात काय होईल हे आत्ताच सांगू शकत नाही; मात्र डिलिमिटेशनच्या पाठिंब्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो," असे सूचक विधान हसन मुश्रीफ यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes