शाहू वस्तुसंग्रहालय खुले करा, ...अन्यथा शाहू जन्मस्थळ येथे सोमवारी शाहूप्रेमी कोल्हापूरकरांचा उपोषणाचा इशारा
schedule24 Jan 26 person by visibility 46 categoryसामाजिक
कोल्हापूर : शाहू जन्मस्थळ येथे सध्या दररोज हजारो पर्यटक, विद्यार्थी हे वाघनखे व शस्त्र संग्रहालयाला भेट देत असताना येथील शाहूंच्या जीवनावर आधारित वस्तूसंग्रहालय पूर्ण होऊन ही कुलूपबंद आहे. ही बाब दुर्दैवी आहे. तेही कोट्यावधी रुपये निधी खर्च करुन निर्माण केलेले हे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक पैलूंचे दर्शन घडविणारे प्रदर्शन बंद करून समस्त कोल्हापूर व शाहू प्रेमीचा अवमान होत आहे. शाहू वस्तुसंग्रहालय खुले करावे म्हणून शाहूप्रेमींनी पाठपुरावा करूनही शासन प्रशासन ढिम्मच आहे. काय बोलावे याला.
शाहू महाराज हे भारतीय सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत असे सांगणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सोमवार दि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शाहू जन्मस्थळ येथे आम्ही शाहूप्रेमी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपोषणाला बसणार आहोत यानंतर शाहुप्रेमींच्या होणाऱ्या उद्रेकाची जबाबदारी शासनाची राहिल. असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी व शाहूप्रेमींनी दिला.
झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खालील मुद्दे उपस्थित करण्यात आले
▪️सामाजिक समतेचे बीज रोवणाऱ्या राजांच्या जन्मस्थळ विकासासाठी 18 वर्षे लागली
▪️निधीसाठी सातत्याने संघर्ष करावा लागला
▪️शाहूंच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षानिमित्त (150 वर्षे) आम्ही मागणी करुनही एकही शासकीय कार्यक्रम झाला नाही
▪️शिव शाहूंचे नाव घेणार नेते ही गप्प का?
▪️आजही शाहूनी निर्माण केलेल्या धरणातून पाणी पिणारे, त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्थातून शिकलेले, शिकणारे या शाहू महारांजाच्या उपकाराची जाणीव ठेवणार आहेत काय?
▪️शाहू विचारांचा आकस कोणाला आहे?