SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कारथकबाकीदारांना नोटिसा बजावून वसुली करा, अन्यथा मिळकतींवर बोजा नोंदवा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडरग्गेडियनच्या ‘रंगताली’ दांडिया-गरबा नाईटला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसादमहायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वासआंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन: एक महत्त्वपूर्ण जागतिक मोहीमकोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटील

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!

schedule13 Oct 26 person by visibility 124 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या रणधुमाळीत राजर्षी शाहू शेतकरी सहविचार आघाडीच्या माध्यमातून शशिकांत शामराव खोत निवडणूक लढवत आहेत. एका मंत्र्याच्या मुलाच्या विरोधात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता मैदानात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत खोत यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.

◼️निवडणूक ही विचार आणि सहकाराची लढाई
शशिकांत खोत यांनी स्पष्ट केले आहे की, ही निवडणूक कोणतीही कुस्ती नसून विचारांची निवडणूक आहे. सहकार क्षेत्रात ते पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आहेत. गेल्या २० वर्षांपासून आपण सार्वजनिक राजकारणात असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकडो गावांशी आणि सर्वसामान्य घटकांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.

◼️महासत्तेविरोधातील लढा
विरोधात कोणतीही महाशक्ती उभी ठाकली तरी आपल्याला काहीही फरक पडत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री महोदयांचे सुपुत्र आणि दूध संघाचे चेअरमन असलेल्या महाशक्तीच्या विरोधात हा लढा सुरू आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास असा राहिला आहे की, जेव्हा जेव्हा कोणी एकटा लढत असतो, तेव्हा तेव्हा कोल्हापूरचा पुरोगामी आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा जिल्हा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो.

◼️सर्वसामान्य मतदारांचे बळ
"माझ्या पाठीशी कोणत्याही राजकीय घराण्याचा वसा किंवा वारसा नव्हता, मला फक्त गुरुपरंपरेचा आणि आदरणीय  आमदार सतेज पाटील यांच्यासह सर्व नेत्यांचा व जिल्ह्यातील दूध उत्पादक ठरावधारकांचा आशीर्वाद लाभला आहे," असे खोत यांनी सांगितले. ही निवडणूक सर्वसमावेशक उमेदवारांच्या जोरावर आणि साहेबांच्या सहकार्याने आपण निश्चितपणे जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूरच्या या सहकाराच्या निवडणुकीत विरोधकांच्या सर्व शक्तींना न जुमानता सर्वसामान्य शेतकरीपुत्र विजयाचा गुलाल उधळणार, असा विश्वास  शशिकांत खोत यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes