संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये "राष्ट्रीय स्तरावरील युरेका २५ प्रोजेक्ट" स्पर्धेचे यशस्वी आयोजन
schedule28 Mar 25 person by visibility 247 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘युरेका २५ प्रोजेक्ट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डिप्लोमा इंजिनिअरिंग अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ३८० हून अधिक प्रोजेक्ट घेऊन १५०० विद्यार्थी उपस्थित होते. या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन इन्स्टिट्यूट चे संचालक, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी फीत कापून केले यावेळी सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक, स्पर्धक, इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजचे आणि इंडस्ट्रीमधील अनुभवी व तज्ञ परीक्षक म्हणून इलेक्ट्रोसाल हाय-टेक प्रायव्हेट लिमिटेड, निपाणी चे सीईओ तुळसिदास साळुंखे, अल्फा क्वेस्ट एंजल्स व्हेंचर चे सीईओ, राहुल सातपुते, लाईव्ह टेक इंडिया चे संचालक, प्रशांत साळुंखे, सॉफ्ट टेक कॉम्प्युटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या संस्थापक सौ. अल्मास एस. शेख शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथील डॉ. विजय मोहोळे, डॉ. एस. डी. रुइकर, डॉ. ए.जे. उमबरकर, डॉ. नितीन गवांकर, केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सौरभ जोशी, महाराष्ट्र राज्य विद्युत प्रसारण कंपनी लिमिटेड सांगली चे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, नितीन के. डाके, दत्ता पॉलिटेक्निक, शिरोळ चे माजी प्राचार्य श्री. जे. डी. माडगूम यांनी काम पहिले आहे.
युरेका २५ प्रोजेक्ट" स्पर्धेस पहिले परितोषिक हायड्रोमोशन पाण्याने चालणारी कार, डीकेटीई च्या सोसायटीचे यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज यांना मिळाले आहे., दुसरा हॅण्डीकेप्ड व्यक्तीसाठी ‘एआय’ आधारित हेड माऊस कॉलेज न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उचगाव, कोल्हापूर यांना मिळाले आहे. तिसरा स्मार्ट मिनी कॉम्प्युटर पीसी,कॉलेज: जयवंतराव सावंत पॉलिटेक्निक, हडपसर, पुणे यांना मिळवला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी, प्रा. सागर चव्हाण, प्रा. रईसा मुल्ला, प्रा. नितीन पाटील, प्रा. धीरज पाटील, प्रा. स्वामी, यांनी विशेष नियोजन केले होते.
या स्पर्धेचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.