SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कारमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून जून-जुलै 2025 च्या 10 वी, 12 वी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्धशिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगडावर स्वच्छता मोहीम‘गोकुळ’च्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे सहकार चळवळ सक्षम... : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापुरात बुलबुले कुटुंबियांची बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त; कारवाई दरम्यान मांजराने कर्मचाऱ्याचा घेतला चावा कोल्हापूर शहराला गुरुवारपासून पुर्ववत पाणी पुरवठा; महापालिकेच्यावतीने 21 टँकरद्वारे 63 फे-याकोल्हापूर शहरामध्ये 12524 नागरीकांची तपासणी

जाहिरात

 

कोल्हापुरात डेंग्यु सदृश्य आजाराने युवकाचा मृत्यू; जिवबा नानाजाधव पार्क परीसरामध्ये 100 घरांचा सर्व्हे

schedule10 Jun 25 person by visibility 341 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर :  जिवबा नानाजाधव पार्क परिसरातील 100 घरांचा आज महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे. या परिसरातील प्रथमेश घाटगे (वय 22) याचा दि.07 जून 2025 ताप आलेने त्याने प्राथमिक उपचाराकरीता खाजगी रुग्णालयामध्ये  तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी प्रथमेश घाटगे याला रक्ताची तपासणी करणेसाठी सांगितले. रक्ताची तपासणी केलेनंतर त्यांचा डेंग्युचा आयजीएम व आयजीजीचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे सदर रुग्णाचा औषधोपचार ओपीडी बेसवर चालु होता.

 परंतु दि.09 जून रोजी रुग्ण प्रथमेश घाटगे हे डॉक्टरांकडे सलाईन लावणेसाठी गेले असता, त्यांना तेथे खुप थंडी वाजुन आली. त्यांतर त्यांनी रुग्णाला तात्काळ खाजगी हॉस्पीटल मध्ये दाखल केले आय.सी.यु.मध्ये  उपचारा सुरु असताना दि.10 जून  रोजी पहाटे 2 चे दरम्यान प्रथमेश घाटगे यांचा डेंग्यु सदृश्य आजाराने निधन झाले.

यामुळे महापालिकेने तातडीने आजुबाजुच्या परीसरातील 100 घरांचा सर्व्हे केला.  यामध्ये या परिसरातील 312 लोकांची तपासणी केली असता या ठिकाणी 7 तापाचे रुग्ण आढळून आले. या सर्व्हेमध्ये 207 कंटेनरची तपासणी कण्यात आली. यामध्ये 5 कंटेनर दुषित आढळून आल्याने ते कंटेनर रिकामे करण्यात आले. त्याचबरोबर 40 नागरीकांचे रक्तजल नमुने तपासणीठी घेण्यात आले. या परिसरामध्ये महापालिकेच्यावतीने धुरफवारणी व औषध फवारणी करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes