SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पन्हाळगडाचे जतन, संवर्धन व संरक्षणासाठी निधी उपलब्ध करुन देणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरपिरामल स्वास्थ्य, सनोफी यांच्यातर्फे कळंबा येथे मोफत आरोग्य शिबिरराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा राजीनामातर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारकार्यावर शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदकरवीर काशी च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन विशेषांकाचे थाटात प्रकाशनपन्हाळा किल्ला जगाच्या नकाशावर : जिल्हाधिकारी अमोल येडगे; युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंदशिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन; महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळखप्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत : राज्य निवडणूक आयुक्तविद्यार्थ्यांना रोजगार संधींच्या दृष्टीने ‘एईडीपी’ उपयुक्त: डॉ. एन.एन. वडोदे; शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय विशेष कार्यशाळाराज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी, शासनाने कोणत्या उपाययोजना आखल्या : आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारकार्यावर शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

schedule12 Jul 25 person by visibility 82 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार आणि कार्य' या विषयावर येत्या १६ व १७ जुलै रोजी दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने परिषद आयोजित केली आहे. ही माहिती परिषदेचे समन्वयक गांधी अभ्यास केंद्राचे डॉ. प्रकाश पवार, डॉ. सुनीलकुमार लवटे आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित टापरे यांनी दिली आहे.

अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी यांच्या हस्ते १६ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल.

 यावेळी अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. अशोक खंडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांच्या बीजभाषणाने परिषदेला प्रारंभ होईल. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांचेही १७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता विशेष सत्रात मार्गदर्शन होईल.
उद्घाटनानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयाचे संपादक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांची मराठी  विभागाचे प्रमुख डॉ . नंदकुमार मोरे आणि विचारशलाका नियतकालिकाचे संपादक डॉ. नागोराव कुंभार विशेष मुलाखत घेतील.

या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार व कार्याच्या अनुषंगाने विविध नऊ सत्रांमध्ये चर्चा करण्यात येईल. अनेक दिग्गज तज्ज्ञ व अभ्यासक या अंतर्गत मांडणी करतील. यामध्ये विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप करंबेळकर, प्रा. राजा दीक्षित, डॉ. रणधीर शिंदे, सर्फराज अहमद, डॉ. श्रीराम पवार डॉ. कौतिकराव ठाले-पाटील, 'साधना'चे संपादक विनोद शिरसाट, प्रख्यात गांधीवादी विचारवंत डॉ. विश्वास पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, श्रीनिवास हेमाडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, ज्येष्ठ विचारवंत अशोक राणा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर आदी सहभागी होणार आहेत.

या परिषदेच्या निमित्ताने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पुस्तके, छायाचित्रे आणि चित्रफिती यांचे विशेष प्रदर्शनही राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. तर्कतीर्थांविषयीच्या शोधनिबंधांचे विशेष सत्रही आयोजिले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. तरी या आंतरराष्ट्रीय परिषदेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes