करवीर काशी च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन विशेषांकाचे थाटात प्रकाशन
schedule12 Jul 25 person by visibility 228 categoryसामाजिक

पन्हाळा : "रौप्यमहोत्सवी 'करवीर काशी' ची प्रबोधनात्मक वाटचाल निश्चितच कौतुकास्पद असून गेल्या २५ वर्षात वस्तुनिष्ठता व विश्वासार्हता ही मुल्ये जपत राज्यभरात करवीर काशी ने वेगळा ठसा उमटवला आहे," असे गौरवोद्गार परमपूज्य सद्गुरू श्री चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी काढले.
साप्ताहिक करवीर काशी च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन क्षेत्र पैजारवाडी येथे मोठ्या थाटात संपन्न झाले, त्यावेळी चव्हाण बोलत होते.
यावेळी सचिव विनायक जाधव म्हणाले, " करवीर काशी च्या २५ वर्षाच्या उज्वल वाटचालीत सद्गुरू चिले महाराज यांचा आशीर्वाद संपादकांच्या पाठीशी अखंड आहे, त्यांचे अखंड कष्ट,परीश्रम व प्रामाणिकपणा आम्ही सुरवातीपासून पहात आहोत, त्यामुळे करवीर काशी ची सुवर्णमहोत्सवाकडे दमदारपणे वाटचाल होणार आहे,यात संदेह नाही."
प्रारंभी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित संपादक डॉ सुनीलकुमार सरनाईक यांनी प्रास्ताविक केले, आपल्या प्रास्ताविकात डॉ सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आवर्जून पाठवलेल्या शुभसंदेशाचा कृतज्ञतेने उल्लेख केला, आजवरच्या वाटचालीत वाचक, वर्गणीदार,जाहिरातदार, व माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्टाफचे आभार मानले.
यावेळी मोतीबाग तालीम चे पैलवान महादेवराव भोसले, विश्वस्त जयसिंगराव पारखे, चंद्रप्रकाश खुटाळे -पाटील, बी. के. घोसाळकर, बाबुराव गराडे, संजय यादव, बापुजी यादव, मिलींद सरनाईक, रमेश सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते, आभार विराज सरनाईक यांनी मानले.