SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पन्हाळा किल्ला जगाच्या नकाशावर : जिल्हाधिकारी अमोल येडगे; युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंदशिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन; महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळखप्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत : राज्य निवडणूक आयुक्तविद्यार्थ्यांना रोजगार संधींच्या दृष्टीने ‘एईडीपी’ उपयुक्त: डॉ. एन.एन. वडोदे; शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय विशेष कार्यशाळाराज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी, शासनाने कोणत्या उपाययोजना आखल्या : आमदार सतेज पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याबाबत आमदार सतेज पाटील यांचा विधिमंडळात प्रश्न ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडे सभासद नोंदणी कराडीकेटीई व आयआयआयटी,धारवाड यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करारकोल्हापूर महापालिकेच्यावतीने 59 सफाई कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी पुर्णकोल्हापूर : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांकडून पंधरा हजार रुपये दंड वसूल

जाहिरात

 

प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत : राज्य निवडणूक आयुक्त

schedule11 Jul 25 person by visibility 220 categoryराज्य

मुंबई : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 वाघमारे म्हणाले की, राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल. मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींची आपल्या स्तरावरील उपलब्धता लक्षात घ्यावी. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आवश्यक संख्येचा अंदाज घेता येईल. मनुष्यबळाबाबत विभागीय आयुक्तांनी समन्वयकाची भूमिका घेऊन सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत वेळोवेळी आढावा घ्यावा. सर्व संबंधितांशी समन्वय आणि नियोजनपूर्वक तयारी केल्यास आपल्याला या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे सहज शक्य होईल.

 काकाणी म्हणाले की, मतदाराची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांची अचूक संख्या निश्चित करता येईल. त्या आधारे पुढील नियोजन करणे सुलभ होईल. मतदान केंद्राचा अचूक अंदाज आल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या आवश्यकतेबाबतही नियोजन करता येईल. मनुष्यबळाचाही अंदाज येईल. विभागीय आयुक्तांच्या समन्वयातून आजुबाजूच्या जिल्ह्यातील मनुष्यबळ उपलब्ध करून घेता येईल. एकूणच तयारीबाबतची सर्व तपशीलवार व अद्ययावत माहिती तयार ठेवावी. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. त्यावेळी ही माहिती सादर करावी.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes