SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

मलकापुरात रक्ताचं नातं रक्ताळलं; क्षुल्लक वादातून सख्ख्या भावाचा काटा काढला; आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून काही तासांत बेड्या

schedule02 May 26 person by visibility 363 categoryगुन्हे

कोल्हापूर  : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथे एका भीषण घटनेत किरकोळ कारणावरून सख्ख्या भावानेच भावाची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

 आज दिनांक २ मे २०२६ रोजी सकाळी नृसिंह मंदिर परिसरातील नगरपरिषदेच्या पाठीमागे नरेंद्र सिदार (मूळ रा. छत्तीसगड) हा तरुण मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात व्यक्तीने त्याला मारहाण करून ठार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर शाहुवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपास करण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी चौकशी केली असता, मयत नरेंद्र आणि त्याचा भाऊ धिरेंद्र इतवारी सिदार (वय ३२) हे दोघे मलकापूर येथे कामासाठी राहत असल्याचे समजले. दिनांक १ मे रोजी रात्री या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते आणि तेव्हापासून धिरेंद्र गायब होता. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून मलकापूर शिवारातील शाळी नदीच्या पुलाजवळील एका शेतातून संशयित धिरेंद्र सिदार याला ताब्यात घेतले.


पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी धिरेंद्रने गुन्ह्याची कबुली दिली. १ मेच्या रात्री त्यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याने लोखंडी पट्टीने मारहाण करत आपल्याच भावाची हत्या केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अनिल जाधव आणि पथकातील अंमलदारांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी शाहुवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes