घुणकीत तरुणांकडून लोकवर्गणीसह स्वयं श्रमदानातून गावातील मुख्य रस्त्याचे काम ! तरुणांकडून ऐतिहासिक पाऊल !
schedule08 Dec 25 person by visibility 108 categoryसामाजिक
घुणकी : येथील सर्वच तरुणांनी एकजूट होऊन गावातील नागरिकांना जागृत करून गावातील मुख्य रस्ता अनेक कारणांनी कित्येक वर्षे वंचित राहिला होता. पण तरुणांनी ठरवलं की आता आपण लोक वर्गणीतून हा मुख्य रस्ता काहीही होऊदे करायचं आणि आता नाही नावासाठी, फक्त गावासाठी, "माझं गाव माझा अभिमान" ही टॅग लाइन घेऊन गावासाठी किमान एकदिवसीय 1 तास संकल्पना घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ सुंदर या संकल्पपूर्तीसाठी माझ्या गावासाठी या भावनेतून 7 डिसेंबर रोजी घुणकी फाटा ते गावातील महादेव मंदीर पर्यंत स्वच्छता तसेच डांबराने खड्डे भरण्याचे काम युवकांसह ग्रामस्थांच्या पुढाकारातून उत्साहात सुरु झाले आहे.
महामार्गानजीक घुणकी फाटा ते चावरे दरम्यान रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. गावातील राधाकृष्ण मंदिरात झालेल्या बैठकीत घुणकी फाटा ते महादेव मंदीर दरम्यान लोकवर्गणीतून खड्डे भरण्याचा निर्णय झाला. या रस्त्यासाठी निधी मजूर असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने जाहिर केले मात्र हा निधी कधी येणार? हा सवाल दरम्यान युवकांनी करुन श्रमदान मोहिमेला सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला.
सुरवातीला युवक, लोकप्रतिनीधी, ग्रामस्थांनी घुणकी फाट्याजवळ संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनाने स्वच्छतेला सुरवात झाली. १०० रुपयांपासून २५ हजारापर्यंत वर्गणीमुळे लाखो रुपये जमा झाले, कोणी जेसीबी, कोणी ट्रॅक्टर, रोडरोलर, चहा, नाष्टा, खडी, मुरुम, झाडू, पाट्या, रंग अशी वर्गणी जमा झाल्याने खड्डे भरण्याचे काम झाले.
दोन जेसीबी, अनेक ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाजूपट्टीची स्वच्छता करण्यात आली. ओढ्याच्या पुलावरील कठड्याची रंगोटी करण्यात आली. खडी, डांबराच्या सहाय्यातून खड्डे भरण्यात आल्याने रस्ता खड्डेमुक्त करण्याचे काम सुरु झाले. हे काम काही दिवस असेच सुरू राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.