कोल्हापूर महापालिकेतर्फे कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
schedule07 Jan 25 person by visibility 304 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने रंकाळा तलावावर विद्युत खांब व दिव्याचे अज्ञात व्यक्ती अथवा वाहनाकडून जे नुकसान झाले होते. त्याविरूद्ध आवाज उठवून प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन अखेर महापालिकेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्ती विरूद्ध गु.र.५५२/२०२४ बी.एन.एस.३२४ (४) प्रमाणे फिर्यादी अमित अरूण दळवी कनिष्ठ अभियंता यांनी रंकाळा तलाव येथे डेकोरेटीव्ह विद्युत खांबाचे अज्ञात वाहनाने धडक देऊन अंदाजे ४०,०००/- रूपयांचे नुकसान केलेचे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सहाय्यक फौजदार आमते तपास करीत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने परिसरातील सी. सी. टीव्ही तपासून त्वरीत कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने याबाबत महानगरपालिकेला गेल्या आठवड्यामध्ये निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. अशी माहिती समितीचे संयोजक किशोर घाटगे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.