SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
“युवकांनो...ड्रग्स मुक्त समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..!” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आरोग्य, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजनआपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळेमुळे अपघात विरहित जीवन जगण्यास मदत ; प्राचार्य महेश आवटेगारगोटी येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शनिवारी उद्घाटनअरविंद देशपांडे यांचे ‘लेखक व विद्यार्थी वाचन संवाद’ उपक्रमांतर्गत विद्यापीठात व्याख्यानकोल्हापूर महानगरपालिका : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 11 व्यापाऱ्यांकडून 90 हजार रुपये दंड वसूलदुचाकी, चारचाकी वाहने चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, 7 चारचाकी, 5 दुचाकी मोटर सायकली जप्तसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे "नव संकल्पपित तंत्रज्ञान प्रकल्पांचे” सादरीकरणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठ आणि "सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठकविभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा घेतला आढावा

जाहिरात

 

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठ आणि "सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठक

schedule07 Jan 25 person by visibility 207 categoryराज्य

 मुंबई  : "सिद्धांता नॉलेज फाउंडेशन" (IKS - Indic Knowledge Systems) एक शैक्षणिक  फाउंडेशन असून भारतीय ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती, आणि इतर प्राचीन शास्त्रांमध्ये असलेल्या ज्ञानाचे संवर्धन, अभ्यास आणि प्रसार करण्याचे काम करत आहे. आयकेएस (Indic Knowledge Systems) सामान्यतः भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे पुनरावलोकन, संवर्धन आणि आधुनिक संदर्भात त्याचे मूल्यांकन करण्याचे कार्य करते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करताना या संस्थेचे विद्यापीठाने सहकार्य घ्यावे आणि आराखडा तयार करावा, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत सांगितले.

मुंबई विद्यापीठ आणि सिध्दांता नॉलेज फाऊंडेशन (आयकेएस) यांच्या समवेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंजावरचे महाराजा राजे बाबाजी भोसले, गायत्री राजे भोसले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी,एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रवर्ती, सिद्धांता नॉलेज फाउंडेशनचे अध्यक्ष जयकिशन झवेरी, कार्यकारी संचालक सुदर्शन जी, सत्या अत्रेयम, महाराजा तंजावर टीम प्रीत खोना, वरिष्ठ प्रबंधक प्रमोद निशाणकर  उपस्थित होते.

 सिद्धांता नॉलेज फाउंडेशनने तयार केलेला अभ्यासक्रम  विद्यापीठात व महाविद्यालय स्तरावर, भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाशी मॅपिंग करून  युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी  राजे बाबाजी भोसले, तंजावर व सिद्धांता नॉलेज फाउंडेशनच्या समन्वयाने लागू करता येईल का यावर चर्चा करण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes