सावकर चषक २०२५ चा मानकरी ठरला दख्खन पन्हाळा; कै.दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
schedule07 Jan 25 person by visibility 325 categoryक्रीडा
पन्हाळा : पन्हाळगडाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्युत रोषणाई मध्ये दिवस-रात्र शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै.दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर-चषक या नावाने भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा गेले नऊ वर्ष पन्हाळा क्रिकेट क्लब यांच्याकडून आयोजन करण्यात येते. २ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेली ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांच्या हस्ते झाले होते. या स्पर्धेचा ६ जानेवारी २०२५ रोजी अंतिम सामना पार पडला.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नावजलेले १६ संघ खेळाडू सहभागी झाले होते.तर फायनल सामना दख्खन पन्हाळा विरुद्ध राजधानी स्पोर्ट्स यांच्यात पार पडला. यात दख्खन पन्हाळा संघ सावकर चषकचा मानकरी ठरला.
तर सेमी फायनल सामन्यासाठी दख्खन पन्हाळा, राजधानी स्पोर्ट्स, भारती स्पोर्ट्स , करवीर ग्रामीण स्पोर्ट्स या चार संघाची लढत झाली. यामध्ये पहिला सेमी फायनल चा सामना दख्खन स्पोर्ट्स विरुद्ध भारतीय स्पोर्ट्स यांच्या दरम्यान अतिशय प्रेक्षणीय व झुंजार असा खेळला गेला .दख्खन स्पोर्ट्स ने भारती स्पोर्ट्स वर मात करत फायनल मध्ये प्रवेश केला. तसेच दुसरा सेमी फायनल मध्ये राजधानी स्पोर्ट्स ने करवीर ग्रामीण स्पोर्ट्स ला मात देत फायनल मध्ये प्रवेश केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील परिसरातील प्रेक्षकांनी गर्दी केली होती. सामन्यामध्ये दख्खन पन्हाळा कडून प्रथमेश राठोड यांनी अतिशय तिखट फलंदाजी करत राजधानीवर मात केली. व दख्खन पन्हाळा हा संघ सावकर चषक व रोख रक्कम १००७७७/-चा मानकरी ठरला तर राजधानी हा संघ द्वितीय क्रमांक ७७७७७/- चषक व रोक रक्कम चा मानकरी ठरला, तर सेमी फायनल मध्ये पराभूत झालेल्या दोन संघना दहा हजार रोख बक्षीस देण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. विनय कोरे उपस्थित होते, त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी पन्हाळा माजी नगराध्यक्ष विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल, चैतन्य भोसले,जीवन पाटील, फक्रुद्दीन मुजावर, सचिन पाटील, हर्षद बच्चे, शैलेंद्र लाड,बाळासाहेब भोसले, नियाज मुल्ला, अख्तर मुल्ला, मोहसीन मुल्ला,सागर गोसावी,रामानंद गोसावी, साहिल पवार, आधी उपस्थित होते.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी गेले आठ दिवस अहोरात्र परिश्रम मुनाफ मुजावर, नवाज फरास, अकिब मोकाशी, मोहसिन मुजावर ,अमीर गोलंदाज, लालू सोरटे, महेश कांबळे, मन्नान फरास, अशपाक गारदी , केवल कांबळे,संग्राम कांबळे,सचिन गवंडी, विशाल कांबळे, शक्ती सोरटे आदींनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन मुन्तजर मुजावर यांनी केले.