SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
“युवकांनो...ड्रग्स मुक्त समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..!” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आरोग्य, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजनआपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळेमुळे अपघात विरहित जीवन जगण्यास मदत ; प्राचार्य महेश आवटेगारगोटी येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शनिवारी उद्घाटनअरविंद देशपांडे यांचे ‘लेखक व विद्यार्थी वाचन संवाद’ उपक्रमांतर्गत विद्यापीठात व्याख्यानकोल्हापूर महानगरपालिका : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 11 व्यापाऱ्यांकडून 90 हजार रुपये दंड वसूलदुचाकी, चारचाकी वाहने चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, 7 चारचाकी, 5 दुचाकी मोटर सायकली जप्तसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे "नव संकल्पपित तंत्रज्ञान प्रकल्पांचे” सादरीकरणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठ आणि "सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठकविभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा घेतला आढावा

जाहिरात

 

उर्दू कार्निवल 2025 चे 11 जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर आयोजन : गणी आजरेकर

schedule07 Jan 25 person by visibility 428 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि कोल्हापूरच्या महापालिकेच्या व अन्य उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने उर्दू कार्निवल 2025 चे आयोजन करण्यात आले आहे,या उर्दू कार्निवलचे 
 उदघाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,या कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ आहेत.अशी माहिती उर्दू कार्निवल 2025 चे  आयोजक गणी आजरेकर, समीर मुजावर, कादरभाई मलबारी,  अबू  ताकीलदार, रफिक शेख, बापू मुल्ला, रहीम महात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दसरा चौक येथील मैदानावर आयोजित या उर्दू कार्निवल 2025 मध्ये कोल्हापूर शहरातील मुस्लिम बोर्डिंग संचलित  नेहरू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,अँग्लो उर्दू हायस्कूल,शिरोली, कोमनपा डॉ.झाकिरहुसेन उर्दू मराठी शाळा सुसरबाग कोल्हापूर,हाजी शाबाजखान आमीनखान जमादार उर्दू मराठी शाळा,जवाहर नगर कोल्हापूर,हाजी गफूर वंटमुरे उर्दू मराठी शाळा विक्रमनगर,मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु हायस्कूल जवाहर नगर कोल्हापूर या शाळांचा समावेश आहे,


उर्दु कार्निवल 2025 मध्ये ऊर्दू  मराठी इंग्रजी  भाषेचा इतिहास,ऊर्दू मुशायरा, ऊर्दू भाषेतील वाडमय मधील विविध प्रकाराचे सादरीकरण,स्नेहसंमेलन अंतर्गत देश भक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर या कार्निवल मध्ये आयोजित प्रदर्शनात सर्वात छोट्या पवित्र कुराणाची प्रत,राजर्षी शाहू महाराजांनी मराठी भाषेत भाषांतरीत करून घेतलेल्या पवित्र कुराणाची प्रत,इसवी सन पूर्व नाण्यांचे प्रदर्शन आणि फूड फेस्टिव्हल सुद्धा आयोजित करण्यात आले आहे.तरी कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ऊर्दू भाषेतील जाणकारांनी व उर्दु भाषेच्या अभ्यासकानी व समस्त कोल्हापूरकरांनी या ऊर्दू कार्निवल 2025 मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक गणी आजरेकर व आयोजकांनी  केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes