अवकाश संशोधनाला गती देण्यासाठी प्रा. राजमल जैन यांच्या विशेष व्याख्यानांचे शिवाजी विद्यापीठाकडून आयोजन
schedule26 Jul 25 person by visibility 215 categoryदेश

▪️'इंडियन इन टू स्पेस' विषयावर अर्जुननगर, कोल्हापूर, सांगली आणि जयसिंगपूर येथे मार्गदर्शन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रच्या वतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, यूकेचे फेलो प्रा. राजमल जैन यांच्या विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. 'इंडियन इन टू स्पेस' या महत्त्वपूर्ण विषयावर ते अर्जुननगर, कोल्हापूर, सांगली आणि जयसिंगपूर येथील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये मार्गदर्शन करतील. विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये विज्ञान, खगोलशास्त्र आणि संशोधनाविषयी आवड निर्माण होण्याकरिता, तसेच, त्यांना आधुनिक वैज्ञानिक प्रगतीबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळेल आणि या क्षेत्रातील उज्ज्वल करिअरसाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
🟣 व्याख्यानांचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.
▪️सोमवार, २८ जुलै २०२५, सकाळी ११ वाजता : देवचंद कॉलेज, अर्जुननगर.
▪️मंगळवार, २९ जुलै २०२५, दुपारी ३ वाजता : पदार्थविज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
▪️बुधवार, ३० जुलै २०२५,सकाळी ११ वाजता: श्रीमती कस्तुरबाई वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय, सांगली
▪️गुरुवार, ३१ जुलै २०२५, सकाळी ११ वाजता, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर
या व्याख्यानांच्या माध्यमातून अवकाश संशोधनातील भारताची प्रगती आणि भविष्यातील शक्यतांवर प्रकाश टाकला जाईल. विज्ञानप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अवकाश संशोधन केंद्रचे , समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.