उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
schedule02 Feb 26 person by visibility 82 categoryराज्य
सातारा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.