SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंबप परीसरात "तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे # 302" पोस्ट चर्चेत, यश दाभाडे खून प्रकरणी आरोपींना अटककोल्हापूर महानगरपालिका : मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडून विविध विभागांचा आढावासाखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी; खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणीकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊसदर एकरकमी 3150 रूपये जाहीरमहापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सुविधांची कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणीचिकोत्रा नदी भागामध्ये उपसाबंदी लागूजागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहातएड्स मुक्त जिल्हा म्हणून लवकरच कोल्हापूरची नवी ओळख निर्माण होईल : प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे; जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त रॅलीचे आयोजनउत्कृष्ट लघुउद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करामारकडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान थांबवले, गाव प्रशासनाच्या दहशतीखाली; उत्तम जानकरांचे आरोप

जाहिरात

 

कोल्हापुरातील कात्यायनी ज्वेलर्स दरोडा : आरोपींपैकी दोन आरोपींना 36 तासात जेरबंद; परप्रांतीय आरोपींच्या शोधात पोलीस पथके रवाना

schedule10 Jun 23 person by visibility 987 categoryगुन्हे

कोल्हापूर : बालिंगा, (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्स दुकानात गोळीबार करून धाडसी जबरी चोरी करणारे आरोपींपैकी दोन आरोपी 36 तासात जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून एकूण 29,88,700 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरने ही कारवाई केली.

08 जून रोजी दुपारी 02.00 च्या सुमारास कोल्हापूर ते गगनबावडा जाणारे रोडवरील बालिंगा हददीत असलेल्या कात्यायनी ज्वेलर्स दुकानात चार चोरट्यांनी घुसून त्यांच्या जवळ असलेल्या पिस्टलने गोळीबार करून व पिस्टलचा धाक दाखवून दुकानामध्ये असलेल्या लाकडी बेस बॉलच्या स्टिकने फिर्यादी रमेश शंकर माळी यांचे डोकीत मारून फिर्यादीस खाली पाडून शिवीगाळ करून लाथांनी मारहाण केली. तसेच दुकानात हजर असलेला फिर्यादी यांचा मेहुणा जितेंद्र माळी यास देखील बेस बॉलच्या स्टिकने कपाळावर मारहाण करून त्या अनोळखी इसमापैकी अंगात पांढऱ्या रंगचा शर्ट परिधान केलेल्या चोरट्याने फिर्यादी यांचे मेहुण्याच्या डावे पायाच्या जांघेत पिस्टलने गोळी मारून त्यास गंभीर जखमी केले. तसेच त्याने त्याचे सोबत आणलेल्या पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये फिर्यादी यांचे दुकानातील अंदाचे सव्वा तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने व 1,50,000/- रूपये रोख रक्कम असा एकूण मिळून 2,06,84, 850/- रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करून ते चौघेही चोरटे फिर्यादीचे ज्वेलर्स दुकानाच्या दारात लावलेल्या दोन मोटर सायकलीवरून निघून गेले. याबाबत फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 भर वस्तीत सदरचा गंभीर गुन्हा घडलेने गुन्ह्याचे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक  जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महादवे वाघमोडे तसेच करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याची माहिती घेतली.

 वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे व शेष मोरे यांची तपास पथके तयार केली. सदर पथकांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून तसेच घटनास्थळाचे व आजूबाजूचे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज द्वारे व तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील तपास पथकांमार्फत या गुन्ह्याचा तपास सुरू असताना महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांना खात्रीशिर माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी विशाल वरेकर, रा. कोपार्डे व सोनार सतिश पोहाळकर यांनी त्यांचे स्थानिक व परराज्यातील साथीदार आरोपीसोबत मिळून केला असून ते दोघे आरोपी विशाल वरेकर, (रा. कोपार्डे) याचे घरी आले आहेत. म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे दोन पंचासह आरोपी विशाल वरेकर याचे कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील घरी जावून छापा टाकला असता आरोपी नामे विशाल धनाजी वरेकर, (वय 32, रा. आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल जवळ, कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व सतिश सखाराम पोहाळकर, (वय 37, रा. कणेरकर नगर, रिंगरोड, फुलेवाडी, कोल्हापूर) यांना पकडून त्यांचेकडे या गुन्ह्याचे अनुषंगाने  विचारपूस केली असता त्यांनी यातील एक स्थानिक व चार परराज्यातील आरोपींचे मदतीने कात्यायनी ज्वेलर्स, येथे दि. 08 जून रोजी कट रचून सदरचा गुन्हा केला असलेची कबुली दिली आहे. तसेच आरोपी विशाल वरेकर याचे माहितीने त्याचे घरातून त्यांनी सदर गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरून नेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी 367 ग्रॅम वजनाचे 22,38,700/-रूपये किंमतीचे सोन्याचे व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी स्वीफ्ट डिझायर गाडी व अॅक्टीव्हा मोपेड असा एकूण 29,88,700/- रूपये किंमतीचा मुददेमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त केलेला आहे. सदरचे दागिने अटक आरोपींनी सदर चौरीतून त्यांचे वाट्यास आले असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील चोरीस गेलेले उर्वरीत दागिने परराज्यातील आरोपी घेवून गेले असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सदर ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी विशाल वरेकर हा यापुर्वी जुना राजवाडा पोलीस ठाणे कडील फसवणुकीचे गुन्ह्यामध्ये कळंबा जेलमध्ये असताना एका परराज्यातील आरोपीशी मैत्री झाली होती. त्याचे सदर आरोपी मार्च-2023 मध्ये जेलमधून सुटलेनंतर एकमेकांचे संपर्कात होते. या दोघांनी मे 2023 चे शेवटच्या आठवड्यात गुन्ह्याचा कट रचला. त्याप्रमाणे परराज्यातून चार आरोपी हे आरोपी विशाल वरेकर याचे घरी राहणेस आले. विशाल वरेकर व सदर आरोपींनी दिनांक 03 ते 05 जून चे दरम्यान कात्यायनी ज्वेलर्सची रेखी करून पुर्व तयारी केली. दरम्यान आरोपी सतिश पोहाळकर याचे मदतीने कोल्हापूर मधील स्वीफ्ट डिझायर गाडी क्र. एमएच 43-डी-9210 चार दिवसांकरीता भाड्याने घेतली. सतिश पोहाळकर याचे आंबिका ज्वेलर्स 2011 पासून ते 2021 पर्यंत बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स समोर होते. सध्या आंबिका ज्वेलर्स, रंकाळा बसस्टँण्ड येथे तो काम करतो, त्यामुळे तो ही हव्यासापोटी सदर कटात सहभागी झाला. दरम्यान सदर घटना करणेकरीता जुना राजवाडा व राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील दोन पल्सर मोटर सायकली चोरून आरोपी सतिश पोहाळकर याचे कणेरकरनगर, फुलेवाडी येथील घरी लपवून ठेवल्या होत्या. सदर घटनेनंतर आरोपी सतिश पोहाळकर व वरेकर यांनी परराज्यातील आरोपींना कात्रज पुणे येथे सोडून आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परराज्यातील आरोपींचे शोध करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील वेगवेगळी शोध पथके रवाना करणेत आली आहेत.

 कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक, जयश्री देसाई व उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग, संकेत गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, विनायक सपाटे, शेष मोरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुहाडे तसेच पोलीस अंमलदार वसंत पिंगळे, रणजित कांबळे, रणजित पाटील, संजय हुंबे, संजय कुंभार, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, अजय वाडेकर, ओंकार परब, अमर वासुदेव, सचिन देसाई, अमर आडुळकर, प्रशांत कांबळे, विनोद चौगुले, सागर कांडगावे, अमित सर्जे, प्रितम मिठारी, सागर माने, युवराज पाटील, नवनाथ कदम, संदीप गायकवाड, राजू कांबळे, प्रविण पाटील, आयुब गडकरी, विलास किरोळकर, नामदेव यादव, अनिल पास्ते, संतोष पाटील, अनिल जाधव, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडेकर व स्वाती झुगर यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes