+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule01 Jul 24 person by visibility 596 categoryदेश
कोल्हापूर : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि त्यांना कोल्हापूर रेल्वे स्थानक तसेच रेल्वे गाड्यांबाबत मागणीचे निवेदन दिले. 

कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या नेहमी हाऊसफुल असतात. अशावेळी कोल्हापूर मुंबई मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे. तसेच कोल्हापूर स्थानकावरून सुटणाऱ्या बहुतेक सर्व रेल्वेगाड्या वळीवडे आणि रुकडी या स्थानकांवर थांबायच्या. मात्र कोरोना काळात हे थांबे रद्द झाले आहेत. शेकडो प्रवाशांची सोय लक्षात घेऊन, ते पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी ही खासदार महाडिक यांनी केली आहे.

 रेल्वेचा पुणे विभाग मनमाड पर्यंत विस्तारित केल्यास कोल्हापूरहून शिर्डी साईनगर पर्यंत एखादी विशेष रेल्वे सुरू करता येईल. त्यातून हजारो भाविकांना मोठी सुविधा निर्माण होईल; याकडेही खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. सध्या मिरज ते परळी या मार्गावर डेमो ट्रेन सुरू आहे. ही गाडी कोल्हापुरातून सुरू करावी, कोल्हापूर- मुंबई मार्गावर धावणाऱ्या कोयना एक्सप्रेस मध्ये चार जनरल डबे वाढवावेत, कोल्हापूर ते सांगली दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे आधुनिकीकरण करावे, अशा मागण्याही खासदार महाडिक यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केले आहेत. अमृत भारत योजनेअंतर्गत सध्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि विकसीकरण होत आहे. त्या अंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारावा अशी मागणी ही खासदार महाडिक यांनी केली आहे. 


सध्या कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते धनबाद या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या कोल्हापुरात आल्यावर सुमारे 48 तास थांबून असतात. अशावेळी या रेल्वे गाड्या, सोलापूर किंवा कलबुर्गी मार्गावर सोडता येतील का, याचाही रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी सूचना खासदार महाडिक यांनी निवेदनातून केली आहे. या सर्व मुद्द्यांचा आणि मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यवाही केली जाईल असे रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांनी खासदार महाडिक यांना सांगितले.