SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कारमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून जून-जुलै 2025 च्या 10 वी, 12 वी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्धशिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगडावर स्वच्छता मोहीम‘गोकुळ’च्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे सहकार चळवळ सक्षम... : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापुरात बुलबुले कुटुंबियांची बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त; कारवाई दरम्यान मांजराने कर्मचाऱ्याचा घेतला चावा कोल्हापूर शहराला गुरुवारपासून पुर्ववत पाणी पुरवठा; महापालिकेच्यावतीने 21 टँकरद्वारे 63 फे-याकोल्हापूर शहरामध्ये 12524 नागरीकांची तपासणी

जाहिरात

 

वटपौर्णिमा उत्साहात साजरी

schedule10 Jun 25 person by visibility 227 categoryसामाजिक

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमा उत्साहात साजरी झाली.श्री अंबाबाई देवालय परिसरात तसेच शहरात व  जिल्ह्यामध्ये  मंगळवारी (ता. १०) वटपौर्णिमेच्या निमित्ताने सुवासिनींनी वडाची पूजा करून सुताचा धागा बांधून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले.

 काठापदराच्या साड्या, गजरा, सौभाग्यलंकारांचा साज लेवून महिलांनी पतीच्या दीर्घायुष्याची व साताजन्माच्या सोबतीची कामना केली. एकविसाव्या शतकात वावरत असलो तरी आई, आजी सासू, सासू यांच्यासमवेत नव्या पिढीतील सुवासिनींसोबत नवविवाहितांनी देखील वटपौर्णिमेचे व्रत मनोभावे केले. 

 सकाळपासून सुवासिनींमध्ये पूजेची लगबग सुरू  होती. वटपौर्णिमेनिमित्त चैतन्यमय असं वातावरण दिसून आले. साजश्रृंगार करून पारंपारिक वेशभूषेत हातामध्ये पूजेचे ताट घेऊन महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. आंबे, केळी, फुले, हळद-कुंकू साहित्याने वडाची विधीवत पूजा करत सुवासिनींनी जन्मोजन्मी हाच पती लाभो, अशी प्रार्थना केली करत विधिवत पूजा करून पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली. परिसरात विविध ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes