कोल्हापुरातील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल; आठ जणांना अटक
schedule10 Jul 24 person by visibility 511 categoryगुन्हे

कोल्हापूर : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लक्ष्मीपुरीत फोर्ड कॉर्नर येथे दुचाकी अडवून आठ जणांनी एकमेकांना हाणामारी केली. सोमवारी (दि. ८) रात्री दहाच्या सुमारास झालेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.
अमोल रमेश पोवार, वैभव विनोद पोवार, सुजल अशोक पोवार, कुणाल प्रकाश पोवार (सर्व रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) यांच्यासह जावेद सिकंदर मुल्ला, सुलतान असकरअली सय्यद, आसीफ यासीन शेख (तिघे रा. सरनाईक वसाहत) आणि जुनेद जावेद शेख (रा. जवाहरनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयितांना अटक केली. लक्ष्मीपुरी पोलिसांकडे त्यांचा ताबा दिला
सोमवार पेठेतील अमोल पोवार हा मित्रासोबत केर्ली येथे जेवणासाठी गेला होता. परत येताना दोन अनोळखी तरुणांनी त्याला शिवीगाळ केली. याचा राग मनात धरून पोवार याने सोमवार पेठेतील तरुणांना फोन केला. पाठलाग करत फोर्ड कॉर्नर येथे दुचाकी आडवी मारून शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना अडवले. तिथे हाणामारी झाली. या हाणामारीचा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली.