SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कारमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून जून-जुलै 2025 च्या 10 वी, 12 वी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्धशिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगडावर स्वच्छता मोहीम‘गोकुळ’च्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे सहकार चळवळ सक्षम... : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापुरात बुलबुले कुटुंबियांची बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त; कारवाई दरम्यान मांजराने कर्मचाऱ्याचा घेतला चावा कोल्हापूर शहराला गुरुवारपासून पुर्ववत पाणी पुरवठा; महापालिकेच्यावतीने 21 टँकरद्वारे 63 फे-याकोल्हापूर शहरामध्ये 12524 नागरीकांची तपासणी

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात 21 टँकरद्वारे 62 फेऱ्या; बुधवारी कमी दाबाने व गुरुवारपासून पुर्ववत पाणीपुरवठा

schedule10 Jun 25 person by visibility 305 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरामध्ये आज 21 टँकरद्वारे 62 फे-याद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. काळम्मवाडी योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा बंद असल्याने महापालिकेच्या 4 व खाजगी 17 टँकरद्वारे शहरातील विविध भागामध्ये पाणी पुरवठा करण्यात आला. काळम्मावाडी योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्रौपर्यंत सुरु राहणार असून रात्रीच काळम्मावाडी येथून पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून बुधवारपासून पुर्ववत पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये राजेंद्रनगर व कळंबा फिल्टर हाऊस जवळील खराब व्हॉल महापालिकेच्यावतीने आज बदलण्यात आले आहेत.

शहरामध्ये आज महापालिकेच्या 4 टँकरक्षरे 27 फे-या व खाजगी 17 टँकरद्वारे 35 फे-या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने  ए,बी वॉर्ड अंतर्गत  मंगळवा पेठ परिसर, शिवाजी पेठ परिसर, सुभाषनगर, रायगड कॉलनी, योगेश्वरी कॉलनी, वारेवसाहत, उद्यमनगर, मंगेशकर नगर परिसर, वर्षानगर परिसर, कणेरकर नगर, सानेगुरुजी वसाहत, राजलक्ष्मीनगर, शिवगंगा कॉलनी, एन.टी.सरनाईक कॉलनी, शाहु बँक परिसर, पाटाकडील तालीम, सुब्राव गवळी तालीम परिसर, मंडलिक वसाहत, किर्ती हौसिंग सोसायटी व ई वॉर्ड अंतर्गत मातंग वसाहत, रघुनाथ चौक, राजारामपुरी, निंबाळकर चौक, कोरगावकर कंपाऊंड - सदर बाजार, शिवाजी पार्क, कदमवाडी, लोणार वसाहत, टाकळा, राजारामपुरी, भारत नगर, राजेंद्र नगर, गोळीबार मैदान, उलपे मळा, कसबा बावडा, वृषाली हॉटेल शेजारी, कनानगर - ताराबाई पार्क, कपूर वसाहत, कदमवाडी, लाईन बाजार, नागाळा पार्क, बापट कॅम्प इत्यादी ठिकाणी 21 टँकरद्वारे 62 फे-या करून शहर व उपनगरामध्ये पाणी पुरवठा करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes