पश्चिम विभागीय अन्वेषन संशोधन स्पर्धा २०२५ -२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाचे यश
schedule24 Jan 26 person by visibility 47 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: शैक्षणिक वर्ष २०२५ -२०२६ मधील पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धा सरदार पटेल विद्यापीठ, गुजरात येथे दि. २० व २१ जानेवारी , २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमधील ६ संशोधन शाखेसाठी शिवाजी विद्यापीठामार्फत २३ जणाचा संघ सहभागी झाला होता.
विद्यापीठ संघामधील Engineering and Technology या शाखेतून शुभम तानाजी गिरीगोसावी, तेजस दिलीप यादव, निलेश सदानंद सुर्यवंशी व स्वप्नाली मगदूम यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
सदर विद्यार्थ्यासोबत संघव्यवस्थापक म्हणून डॉ. एम. पी. भिलावे, प्राणीशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ व डॉ श्रीमती कविता वड्राळे, यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, शिवाजी विद्यापीठ आणि प्रा. प्रणाली टाकले, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फर्मसी, कोल्हापूर हे उपस्थित होते.
अन्वेषन संशोधन स्पर्धेसाठी विद्यापीठ संघास प्रा. डॉ. सुरेश गोसावी कुलगुरु, प्रा. डॉ. जे पी जाधव, प्र-कुलगुरु, डॉ. व्ही. एन. शिंदे, कुलसचिव, डॉ. टी एम चौगले, संचालक, विद्यार्थी विकास, डॉ पी के पवार, अविष्कार समन्वयक, व विद्यार्थी विकास विभागातील सर्व प्रशासकीय सेवक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.