SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परतनागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ; नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न : मुख्यमंत्रीकारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधीउत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सोमवारी प्रारंभ 'गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना ८% लाभांश जाहीरस्मॅक आयटीआयचे गुणवंत विद्यार्थी ठरले महापारेषणसाठी योग्य !संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला एसडीजी फोकस एज्युकेशनल एक्सलन्स'' पुरस्कार रक्षाबंधनाचा स्नेह, सामाजिक बांधिलकीचा मातोश्री फौंडेशनचा सामाजिक उपक्रमपर्यावरण पूरक रक्षाबंधनकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची दि.११ व १२ ऑगस्ट रोजी संवर्धन प्रक्रिया; कलश व उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था

जाहिरात

 

अवयवदान प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात

schedule09 Aug 25 person by visibility 126 categoryराज्य

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून अवयवदान पंधरवडा दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत सुरु आहे. याबाबत जनजागृती वाढविण्यासाठी अवयवदान प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्य सेवक प्रशिक्षणार्थी  व आरोग्य सेवकांनी सहभागी होत अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली.

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी अवयवदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरित केले. या वेळी सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यांमधील प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

डॉ.योगेश साळे म्हणाले, अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचू शकते. त्यामुळे प्रत्येकाने या बाबतीत सकारात्मक विचार ठेवावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या कीर्ति रूपे उरावे या विशेष अवयवदानाची चळवळीचा उल्लेख या ठिकाणी केला. सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना अवयव दान विषयी आवाहन केले. 

मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्यास तयार असल्याची प्रतिज्ञा 100 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात घेतली. यामुळे समाजात अवयव दानाबाबत जागरुकता वाढेल.  प्रतिज्ञेचे  वाचन आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर कडील वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक भोई यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes