भास्करराव जाधव वाचनालयाच्या विविध शाखांमध्ये सभासद नोंदणीस सुरुवात; मुख्य शाखेत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात प्रवेश सुरु
schedule09 Aug 25 person by visibility 193 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे श्री भास्करराव जाधव वाचनालय हे शहरातील एक नामवंत वाचनालय आहे. याची मुख्य शाखा शिवाजी पेठेतील गांधी मैदानात येथे असून, राजारामपुरी, रुईकर कॉलनी आणि कसबा बावडा येथेही त्याच्या शाखा कार्यरत आहेत. या वाचनालयाच्या सर्व शाखांमध्ये ग्रंथ विभाग, नियतकालिके विभाग, बालविभाग यांच्यासह महिलांसाठी विशेष साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. वाचन संस्कृती रुजवणे आणि सुजाण नागरिक घडवणे हा वाचनालयाचा मुख्य उद्देश असून, अल्प वर्गणीमध्ये सभासदत्व घेण्याची सुविधा नागरिकांना देण्यात येत आहे. एकाच सभासदत्वावर सर्व चारही शाखांमधील पुस्तकांचा लाभ घेता येणार आहे.
वाचनालयाच्या मुख्य शाखेत ग्रंथ नियतकालिके, बाल विभाग व महिलांसाठी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र असून अभ्यासिका व स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. येथे वाचक, विदयार्थ्यांना प्रवेश देणे चालू आहे. या ग्रंथालय व अभ्यासिकेच्या सभासदत्वासाठी गांधी मैदान येथील सुशांत कांबळे (मोब.नं. 7745001303) यांचेशी संपर्क साधावा.
राजारामपुरी येथील भास्करराव जाधव वाचनालयाच्या शाखेमध्ये सभासदत्वासाठी क.लिपीक शोभना पटवणे (मो.नं.9022524181), रुईकर कॉलनी येथील महात्मा गांधी मार्केटमध्ये सभासदत्व संपर्कासाठी शिरीष शिंदे (मो.नं.9921699899), कसबा बावडा फायर स्टेशन जवळील शाखेमधील शशिकांत पाटील (मो.नं.9545503150) यांचेशी संपर्क साधावा.
तसेच, ताराबाई पार्क येथील पितळी गणपतीजवळील एम्पायर टॉवरमध्ये महानगरपालिकेची ई-लायब्ररी सुरु करण्यात आली आहे. येथे विद्यार्थ्यांसाठी सशुल्क वाय-फाय सुविधेसह डिजिटल वाचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील ई लायब्ररी मध्ये प्रवेशासाठी निरंजन दंडगीदास (मो.नं. 9049340395) यांच्याशी संपर्क साधून आपली मेंबरशीप करुन घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.