नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये एक राखी जवानासाठी उपक्रमास प्रतिसाद
schedule09 Aug 25 person by visibility 172 categoryसामाजिक

कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूरमध्ये बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी एक राखी जवानांसाठी उपक्रमांतर्गत 100 राखी तयार करण्यात आले. मुलांनी खूप मन लावून आणि नाविन्यपूर्ण राखी बनवल्या विशेष म्हणजे येथे शिकणारे 90 टक्के विद्यार्थी मुस्लिम आहेत तरी देखील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तने सहभाग नोंदवला.
यासाठी मुस्लिम बोर्डिंग उपाध्यक्ष आदिल फरास चेअरमन गणी आजरेकर प्रशासक कादर मलबारी व स्कूल कमिटी चेअरमन रफिक शेख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक काझी. एस. एस व कलाशिक्षक आर.डी मुल्ला सर यांचे मार्गदर्शन लाभले.
🌐 मुलांनी खूप मन लावून आणि नावीन्यपूर्ण राखी बनवल्या आहेत. त्यामागची त्यांची भावना लक्षात घेण्यासारखी आणि इतर विद्यार्थयासाठी प्रेरणादायी आहे.
▪️गणी आजरेकर,
चेअरमन, मुस्लिम बोडिंग, कोल्हापूर