SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- संतवाणी संताच्या रचनांवर आधारित‘ कार्यक्रम उत्साहात कोल्हापुरात पाडव्यानिमित्त रंगल्या म्हशींच्या सौंदर्य स्पर्धाबीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात… घरकुल बांधणीत बीड जिल्ह्याने रचला नवा विक्रम!इस्रोच्या स्थापनेतील शिल्पकार डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन टेन्शन वाढलं? : महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व मंत्राच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट होणार३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम : मंत्री ॲड.आशिष शेलारऐन दिवाळीत पावसाची एन्ट्री ; राज्यात काही भागात मुसळधार पावसाचा इशारामराठी संस्कृती जपणारे कार्यक्रम मोठ्याप्रमाणात आयोजन करणार : ॲड.आशिष शेलारसेवाभावी संस्थांची सामाजिक बांधिलकी...आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

जाहिरात

 

गगनबावड्याच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार : खासदार छत्रपती शाहू महाराज

schedule10 Sep 24 person by visibility 621 categoryराजकीय

गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील रस्ते, शेती, पर्यटन आदि क्षेत्राच्या विकासासाठी खासदारकीच्या माध्यमातून सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिली. असळज (ता.गगनबावडा) येथे गगनबावडा तालुका संपर्क दौ-यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गगनबावडा तालुका निर्णायक तालुका आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अपमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. लोकसभेत गगनबावड्यातून भरघोस मताधिक्य दिल्याबद्दल येथील जनतेचे आभार मानत आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणून परिवर्तन करुया असेही ते म्हणाले.

आमदार सतेज पाटील म्हणाले, "कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात आर्थिक समृध्दी आली. पालकमंत्री असताना गगनबावड्यासाठी कोट्यावधीचा निधी दिला असून आता आमदार असताना देखील जास्तीचा निधी देत तालुक्याच्या विकासाला गती दिली आहे. तालुक्याचा पर्यटन विकास, कळे-गगनबावडा मार्ग दुरुस्तीसाठी प्रयत्नशील आहे. आगामी काळात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. गतवेळी स्व. आमदार पी. एन. पाटील यांच्यासाठी गगनबावड्याने ताकद दिली. आता पुन्हा राहुल पाटील यांचेसाठी ताकदीने काम करुया."

शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, कारखान्याचे संचालक बजरंग पाटील, मानसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गगनबावडा तालुकावासियांच्यावतीने नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमास गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, अनिल घाटगे, कारखान्याचे उपाध्यक्ष बी. डी. कोटकर, कारखान्याचे संचालक चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, महादेव पडवळ, दत्तात्रय पाटणकर, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, गुलाबराव चव्हाण, प्रभाकर तावडे, रविंद्र पाटील, तानाजी लांडगे, वैजयंती पाटील, उदय देसाई, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश पानारी, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, भगवान पाटील, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, एम. जी. पाटील यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व आभार गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी मानले.

🟠 माजी आमदार चंद्रदीप नरके गटाच्या रावणवाडी (ता. गगनबावडा) येथील कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes