इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत कार्यशाळा व कृत्रिम बुध्दिमत्ताबाबत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
schedule26 Apr 25 person by visibility 201 categoryराज्य

कोल्हापूर : 100 दिवसांचा कृती आराखडा उपक्रमांतर्गत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर या कार्यालयामार्फत महाराष्ट्र सार्वजनिक व्यवस्था अधिनियम, 1950 याबाबतची कार्यशाळा व कृत्रिम बुध्दिमत्ताबाबत प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाली. प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याबाबत पारदर्शक, गतीमान, लोकाभिमुख प्रशासन नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी कार्यालयीन गतिमानता अभियान राबविण्याच्या अनुषंगाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कोल्हापूर कार्यालयामार्फत 100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत विशेष मोहिमेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सार्वजनिक व्यवस्था अधिनियम 1950 व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण या विषयांबाबत भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय कंदलगाव, कोल्हापूर येथे शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये अॅड. राजेंद्र जाधव यांनी सीएसआर निधी विषयी अॅड. पराग राणे यांनी संस्था व न्यासांचे बदल अर्जाविषयी माहिती दिली. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधीक्षक डॉ.विशाल क्षीरसागर यांनी न्यासांचे हिशोब पत्रकाबद्दल माहिती दिली. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तेजश्री गुरव व भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शगुप्ता मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. इतर मागास बहुजन कल्याण कोल्हापूरच्या सहाय्यक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयचे डॉ. के. आर. देसाई, विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिक व कम्युनिकेशन आणि डॉ. आर. जे. जरग, विभाग प्रमुख, औषध निर्माण शास्त्र हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अमित घवले यांनी केले. तर इतर मागास बहुजन कल्याण कोल्हापूरच्या सहाय्यक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक आश्रम शाळा दानवाडचे सहाय्यक शिक्षक अनिल अंबुपे यांनी केले. इतर मागास बहुजन कल्याण कोल्हापूरचे निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील 23 आश्रम शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व लिपिक उपस्थित होते. अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण कोल्हापूरच्या सहाय्यक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.