विभागीय शालेय बास्केटबॉल स्पर्धत यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी
schedule15 Oct 24 person by visibility 392 categoryक्रीडा
कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा - 2024 भानू तालीम संस्था मिरज येथे झालेल्या 19 वर्षाखालील कोल्हापूर विभागीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत मुलींचा गटात यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय संघाने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली
विजयी संघामध्ये जानवी खामकर, हर्षदा शेळके, तनिष्का जगताप, आर्या भोसले, उत्कर्षा सूर्यवंशी, जिज्ञासा घुगे, समृद्धी जाधव, प्रतीक्षा सिद, प्रणाली वायदंडे श्रुतिका गोसावी व समृद्धी पाटील या खेळाडूंचा सहभाग होता.
विजयी संघाला श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. शेख यांचे प्रोत्साहन मिळाले. तसेच महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. क्रांतीकुमार पाटील बास्केटबॉल प्रशिक्षक उदय पाटील व रोहित घेवारी यांचे मार्गदर्शन लाभले.