SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

कोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई

schedule16 Jun 26 person by visibility 394 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.2 छ.शिवाजी मार्केट व अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज बिनखांबी गणेश मंदीर ते महाद्वार चौक व जोतिबा रोड या परिसरात धडक कारवाई करत अनधिकृत फेरीवाले व मंदिराभोवती असलेल्या फुलवाले यांच्या अतिक्रमणावर आज कारवाई करण्यात आली.

 या कारवाईमध्ये 8 लोखंडी पाईप, 1 लोखंडी  टेबल, 1 बुके टेबल, 1 मोठी छत्री, 2 लोखंडी जाळी, 1 स्टॅण्ड बोर्ड, 1 काऊंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच जोतिबा रोडवरील मंदिराच्या भोवती उभारण्यात आलेले 13 फुलवाले स्टॅाल, 3 बेन्टेक्स स्टॅाल व 5 ओटी स्टॅाल काढून टाकण्यात आले. या कारवाईमध्ये विभागीय कार्यालय क्र.2 छ.शिवाजी मार्केट व अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत कारवाई करुन ती निष्काषीत करण्यात आली.

   महानगरपालिकेच्या ठराव क्र.83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

   ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. आजची मोहिम उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कारवाईमध्ये सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण, अग्निशमन दल, विभागीय कार्यालय क्र. 2 कडील कर्मचारी व जुना राजवाड्याकडील पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes