SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळा प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली १२ कोटींचा ढपला पाडण्याचा घाट; शिवसेनेचा संतप्त सवाल - 'बहुतेक कोल्हापुरात एलियन्स आले की काय?'"युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावे”पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे पालक सभा उत्साहात; विद्यार्थिनींच्या प्रगतीचे पालकांकडून कौतुकमहिला समानता दिन: समानतेच्या हक्काची आणि प्रगतीची नवी क्षितिजेसीमेवरील जवानांसाठी करवीरकर भगिनींची ओवाळणी: 'एक राखी' ठरतेय बारा हत्तींचे नैतिक बळ!पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा : आमदार यड्रावकर ; पंचगंगा प्रदूषणासंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक संपन्न स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वागिण विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाहीआमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा : सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार

जाहिरात

 

दुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिल

schedule16 Jun 26 person by visibility 351 categoryराज्य

कोल्हापूर : इरिगेशन फेडरेशन व लाभधारक शेतकरी यांच्या सोबत दिनांक 15 जून रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार इरिगेशन फेडरेशन व लाभधारक शेतकरी यांनी दूधगंगा धरण वगळता इतर सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने शेतीकरिता एक सिंचन आवर्तन देण्याची मागणी केली असल्याने दूधगंगा नदी वगळता सर्व नद्यावरील उपसाबंदी 17  ते 19 जून  पर्यंत शिथिल करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाने (उत्तर) प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

 दिनांक 20 जून रोजी धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. धरणांतील व प्रकल्पातील मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करुन बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांकडून सांडपाणी/औद्योगिक वापरातील पाणी,थेट नदीत सोडून पाणीसाठा दूषित करु नये.

प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळावा, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes