SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
१३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान तडजोड प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत; नागरिकांनी अफवांना बळी पडू नयेशिवाजी विद्यापीठात दिव्यांगांसाठी करिअर गाईडन्स, सांस्कृतिक कार्यक्रममहाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजनडीकेटीईचा देशपातळीवरील आयआयसी मीट मध्ये बेस्ट पोस्टर पुरस्काराने सन्मानभ्रष्टाचार निर्मूलन संदर्भातील "चला भ्रष्टाचार संपवूया" जागरुकता कार्यशाळेचा व्यापारी-उद्योजकांनी लाभ घ्यावाकोल्हापूर : शूटिंग रेंजचे खाजगीकरण होणार नाही : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापुरात माजी महापौर सई खराडे, शिवतेज खराडे, इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !आमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून एक हजार एलईडी दिवेमेंडोलीन वादक प्रदीप्तो सेनगुप्ता, बासरीवादक किरण विणकर, हार्मोनियम वादक सचिन जांभेकर यांच्या तालासुरांची जुगलबंदी ऑल टाईम हिटस् या कार्यक्रमातू रसिकांना अनुभवता येणार

जाहिरात

 

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

schedule15 Sep 25 person by visibility 264 categoryराज्य

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

मुंबई  : गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती  चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

या शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा,  सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव राजेशकुमार यांनी श्री.देवव्रत यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes