SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंगणवाडी सेविकांचा प्रलंबित मागण्यासाठी सोमवार, 14 जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा कोल्हापूरमध्ये वंध्यत्वासंदर्भातील सर्वांगीण शास्त्रीय परिषद संपन्न; महाराष्ट्र शाखा ISAR (MSR), KOGS चा संयुक्त उपक्रमराष्ट्रपतींकडून राज्यसभेवर ४ जणांची नियुक्ती, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचा समावेश ६ महिन्यांचे थकित मानधन देण्यासाठी पाठपुरावा करणार्‍या खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रतीे आशा सेविकांकडून कृतज्ञता व्यक्तपावनखिंड तरुणांना ऊर्जा देणारी शिवमोहीम : पालकमंत्री प्रकाश आबिटकरसाप्ताहिक करवीर काशीच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचेकडून गौरवडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकनबहुमताच्या जोरावर विधिमंडळातील नियम धाब्यावर ; आमदार सतेज पाटील यांची राज्य सरकारवर टीकापेठवडगांव परिसरातील "पैलवान गॅग" एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्हा वाहतुक सल्लागार समितीची बैठक : वाहतूक समस्या, उपाययोजना बाबत सकारात्मक चर्चा

जाहिरात

 

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साकडं

schedule11 Jul 25 person by visibility 280 categoryराज्य

▪️50 हजार कोटीच्या ढपल्या मध्ये, आपणालाही काही मिळेल काय या अशानेच काही लोक शक्तीपीठाचे समर्थन करत आहेत; माजी खासदार राजू शेट्टी यांनी, आमदार क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला टोला

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घालण्यात आल. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात आज शुक्रवारी मुंबईत बैठक होत आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी त्याचबरोबर शक्तीपीठ विरोधी कृती समितीन, मात्र, हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून हा महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडे अंबाबाईला घातले. 

  शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी,  पांडुरंगाला साकडे घातल्यानंतर आता करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साकडे घालण्यात आले.एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत आज शुक्रवारी बैठक होत आहे. या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि सरकारला सुबुद्धी द्यावी आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा. या मागणीसाठी आज साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईला, इंडिया आघाडी आणि शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीन साकडे घालण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग झाल्यास कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा महामार्ग विकासाकडे नाही तर विनाशाकडे नेणारा आहे. म्हणून हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यात आले.

 यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा. अशी एक मुखाने मागणी केली.
 
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी, शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातून विरोध होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातून याला विरोध नाही. असे भासवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. 50 हजार कोटीचा यामध्ये ढपला पाडला जाणार आहे. यामध्ये आपणाला काही मिळेल काय या अशानेच काही लोक याच समर्थन करत आहेत. असा टोलाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांच नाव न घेता लगावला. जे आमदार मुंबईमध्ये शक्ती पिठाच्या समर्थनार्थ बैठक घेणार आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या जनतेन त्यांना मत देऊन निवडून दिले आहे. हे विसरू नये.

शक्तीपीठ महामार्गामुळ अर्ध कोल्हापूर महापुराच्या खईत लोटल जाणार आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या महामार्गामुळे जाणार आहेत. शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे, आई अंबाबाई सरकारला सुबुद्धी दे.. या महाराष्ट्रावरच शक्ती पिठाच संकट टळू दे... असं साकडे घालण्यात आले. तर यावेळी श्री अंबाबाई ची आरती देखील करण्यात आली.

 या आंदोलनात शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवि इंगवले, राजू लाटकर, आर के पोवार, सचिन चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, रघुनाथ कांबळे, अनिल घाटगे, प्रकाश पाटील, तौफीक मुल्लाणी, अजित पोवार, बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, आनंदा बनकर, दता वारके, सागर कोंडेकर, सुयोग वाडकर, युवराज गवळी, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, प्रवीण केसरकर, राजाराम गायकवाड, ईश्वर परमार, विनायक फाळके, सचिन पाटील, जय पटकारे, रियाज सुभेदार, फिरोज सौदागर, दिग्वीजय मगदूम, भैया शेटके, किशोर खानविलकर, संपत चव्हाण, शशिकांत बिडकर, संजय पटकारे, विनायक घोरपडे, अक्षय शेळके, उमेश पाडळकर, वैशाली पाडेकर, आदिसह शेतकरी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes