आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; दक्षिण कोरियाशी भिडणार
schedule06 Sep 25 person by visibility 81 categoryक्रीडा

नवी दिल्ली : आशिया कपमध्ये शेवटच्या सामन्यात भारत आणि चीनमध्ये रोमांचक सामना झाला. बिहारच्या राजगीर स्पोर्टस कॉम्पलेक्स खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने ७-० या फरकाने चीनवर विजय मिळवला. भारताने या विजयाने फायनल मध्ये पोहचला आहे. भारताचा सामना ५ वेळा चॅम्पियन ठरलेल्या दक्षिण कोरियाशी होणार आहे.
भारताने चौथ्या मिनिटाला चीनविरोधात पहिला गोल केला. त्यानंतर सातव्या मिनिटाला संघाला पॅनल्टी कॉर्नर मिळला. पुढे दिलप्रीत सिंहने रिबाऊंड गोल केला. २-० ने स्कोर असताना पहिला क्वार्टर संपला.
पुढील काही वेळेत भारत तिसरा गोल करण्यास यशस्वी ठरला. तिसऱ्या क्वार्टरचा खेळ संपत असताना भारताने ५-० ने आघाडी घेतली होती. चौथ्या क्वार्टरमध्ये भारतासाठी अभिषेकने ४ मिनिटाला २ गोल केले. तर भारताने पुढे ७-० ने विजय निश्चित केला.
हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आतापर्यंत एकही सामन्यात पराभव झाला नाही. भारतीय संघ टीम पूल-ए मध्ये पहिल्या क्रमाकांवर कायम राहिला. भारतीय संघाने ६ पैकी एक सामना गमावला. तो सामना २-२ ने अनिर्णित ठरला. त्याचदक्षिण कोरिया संघाशी भारताचा फायनलमध्ये सामना होणार आहे.