महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण बाबू जमाल तालीम गणपती समोर उत्साहात
schedule06 Sep 25 person by visibility 130 categoryसामाजिक

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहूंच्या काळापासून मोठी परंपरा असलेल्या शिवाजी पेठेतील बाबूजमाल तालमीचा गणपती त्याचबरोबर हिंदू मुसलमान ऐक्याचे प्रतीक श्री नरसिंह गणेशा समोर अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम उत्साह झाला.
भावे काका ,जगदीश गुळवणी , मेघना जोशी , अध्यक्ष अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वशीर्ष पठण बाबू जमाल दर्ग्यावरील श्री नृसिंह गणेश समोर 334 महिला सह पुरुषांनी सहभाग घेतला .
सर्व सहभागी महिलांना भगव्या टोप्यासह प्रसादाचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे नियोजन विश्व हिंदू परिषदेचे ॲड . सुधीर जोशी -वंदुरकर , बाबुजमाल तालमीचे अध्यक्ष अमित चव्हाण खजानीस प्रताप पाटील सचिव अभय नाचणकर, दिपक चव्हाण, शकील जमादार, रणवीर निंबाळकर धनंजय महेंद्रकर तसेच आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे आदिनी केले होते .
प