कोल्हापुरात ईद-मिलाद-उन-नबी धार्मिकतेने साजरी
schedule05 Sep 25 person by visibility 215 categoryसामाजिक

कोल्हापूर : हजरत पैगंबर महंमद यांच्या जन्मदिवसानिमित्त आज मुस्लिम समाजातील आज ईद-मिलाद-उन-नबी मोठ्या धार्मिकतेने साजरी करण्यात आली. आज शुक्रवारच्या नमाज मध्ये विश्वशांती व भारताची उन्नती व्हावी या करता दुवा पठण करण्यात आले.
सध्या गणेश उत्सव सुरू असल्याने प्रशासकावरती पडणारा ताण पाहता जुलूस मिरवणूक आज न काढता दिनांक 10 सप्टेंबर रोजी ईदगा मैदान पाण्याचा खजिना नंगीवली चौक येथून सकाळी दहा वाजता काढण्यात येणार असून बाबू जमाल दर्गाहा पर्यंत जुलूस मिरवणूक काढण्यात येणार आहे. बाबू जमाल दर्गाहा या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
जुलूस मिरवणूक मध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी व्हावी असे आवाहन हाजी फिरोज सतारमेकर, जुलूस कमिटी संस्थापक अध्यक्ष हाजी रशीद काजी, हाजी लियाकत मुजावर , शकील मुत्वली, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी केले आहे.