नगररचना विषयीच्या समस्या 22 जुलै पर्यंत कळवा
schedule11 Jul 25 person by visibility 207 categoryराज्य

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या 100 दिवस कृती कार्यक्रम या उपक्रमाच्या आधारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमानता अभियान कोल्हापूर हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील नगर रचना विषयक तक्रारी, अडचणी, सूचना व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी नगर रचना विषयक तक्रार, समस्या, अडचण, सुचना असल्यास सहायक संचालक, नगर रचना कार्यालयास प्रत्यक्ष, टपालाद्वारे किंवा adtp_kolhapur@rediffmail.com या ईमेल वर दिनांक 22 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6.15 पर्यंत कळवाव्यात.
तसेच आपल्या सूचना, समस्या सोबत जोडलेल्या क्यूआर कोडवर देखील नोंदवू शकता, असे आवाहन नगर रचना कार्यालयाचे सहायक संचालक वि.पं. झगडे यांनी केले आहे.