महाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंय : सतेज पाटील यांचा सवाल
schedule11 Dec 25 person by visibility 57 categoryराज्य
कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रात दररोज ६ खून आणि २३ बलात्काराच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राच्या कायदा सुवव्यवस्थेवर डाग पडला असून गृहविभाग काय करतोय असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी विधिमंडळात उपस्थित केला.
आमदार पाटील म्हणाले, पुण्यात कोयता गँग सक्रिय आहेत. राज्यातील महिला आणि मुली अत्याचाराला बळी पडत आहेत. संतोष देशमुख प्रकरण असेल, डॉ. संपदा मुंडे प्रकरण असेल अशा घटनांमुळे महाराष्ट्राच्या कायदा सुवव्यवस्थेवर डाग पडला असल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले, पुरवणी मागणी ही आकस्मिक निधीसाठी असताना निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केलेली पुर्वनियोजित उधळपट्टी आहे. ती राज्याच्या आर्थिक स्थैर्यावर घाला घालणारी, आणि काही मोजक्यात लोकांचे हित जपणारी आहे. सरकारने आर्थिक शिस्त कुठे? प्राधान्यक्रम कुठे? आणि जनतेचे हित कुठे? याचे उत्तर दिले पाहीजे अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.
▪️ पुरवणी मागण्या राजकीय स्वार्थाने प्रेरित
राज्य सरकारने आणलेल्या पुरवणी मागण्या या आर्थिक गरजेपेक्षा निवडणूकपूर्व राजकीय स्वार्थाने प्रेरित आहेत. ७.५ लाख कोटींचे बजेट आता ८ लाख ९० हजार कोटींवर पोहोचले आहे. त्यामूळे मुळ अर्थसंकल्प तब्बल १७. ५३ टक्क्यांनी फुगवला आहे. राज्याचे एकूण कर्ज ९,३२,००० कोटी वाढून प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ८२ हजारांचे कर्ज वाढले आहे. ही वाढ म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग आणि सरकारकडे कोणतीही दूरदृष्टी नसल्याचे द्योतक असल्याची टीकाही त्यांनी केली.
▪️ कृषी समृद्धी योजनेला न्याय मिळेना
पुरवणी मागण्यांमध्ये ८७ टक्के निधी फक्त ११ विभागांना देण्यात आला असून कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास यांसारख्या मूलभूत क्षेत्रांसाठी तुटपुंज्या तरतुदी केल्या आहेत. राज्यातील पीक विमा योजना बंद केल्या आणि कृषी समृद्धी योजना चालू केली गेली. मात्र वित्त खाते त्याला न्याय देत नाही. कृषी खात्याला फक्त ६१६ कोटी निधी दिला असून त्यातील तब्बल २२२ कोटी गोशाळांना वितरित केला आहे. शेतकऱ्यांची १२,५०० कोटींचे प्रलंबित देयके असताना केवळ ६१६ कोटी रुपयांची तरतूद ही शेतकऱ्यांचा अपमान असल्याची टीकाही आमदार पाटील यांनी केली.
▪️ भ्रष्टाचारामुळे रस्त्यांची कामे निकृष्ट
सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्यात ४० हजार कोटींची देयके प्रलंबित असल्याने कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या वाढत आहेत. भ्रष्टाचारामुळे राज्यातील रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोपही त्यांनी केला.महाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंयमहाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंयमहाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंयमहाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंय